ऑनलाइनच्या आभासी जगात आपण कशावर विश्वास ठेवावा ही आपली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 07:25 PM2020-04-21T19:25:13+5:302020-04-21T19:26:21+5:30

आपण कशावर विश्वास ठेवायला हवा आणि कशावर नाही तरच आपण इंटरनेटवरील असुरक्षित गोष्टींपासून सुरक्षित राहू शकतो आणि अधिक सावध होऊ शकतो.

It is your responsibility to trust in the virtual world of online | ऑनलाइनच्या आभासी जगात आपण कशावर विश्वास ठेवावा ही आपली जबाबदारी

ऑनलाइनच्या आभासी जगात आपण कशावर विश्वास ठेवावा ही आपली जबाबदारी

googlenewsNext

 

सीमा महांगडे

मुंबई : ऑनलाइनच्या आभासी जगात आपण कशावर विश्वास ठेवावा ही आपली जबाबदारीअसून  आपण कशावर विश्वास ठेवायला हवा आणि कशावर नाही तरच आपण इंटरनेटवरील असुरक्षित गोष्टींपासून सुरक्षित राहू शकतो आणि अधिक सावध होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया कूल कीड सोनियाने दिली. रिस्पॉन्सिबल नेटीजन्स या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या फेसबुक सेशनमध्ये तिने आपले मत नोंदवले. लॉकडाऊनच्या निमित्ताने शाळांमध्ये आणि विविध क्लासेस, उपक्रम यांमध्ये गुंतलेली मुले या काळात इंटरनेट आणि ऑनलाईनच्या सर्वाधिक सहवासात आलेली आहेत. अशावेळी मोठ्यांप्रमाणेच घरात क्वारंटाईन झालेली मुले ही मोठ्यांपेक्षा अधिक व्यवस्थित रीतीने ही सगळी परिस्थिती हाताळत असल्याचे मत रिस्पॉन्सिबल नेटीजन्सच्या कुल किड्सने नोंदवले आहे.

लॉकडाऊनच्या काळात क्वारंटाईन क्वारंटाईन झालेली ही मुले ऑनलाईन अभ्यासा सोबतच नवीन संशोधन पेपर आणि गोष्टी याबद्दल वाचणे, अधिकाधिक विविध प्रकारची पुस्तके वाचणे, मोठ्याना घरकामात मदत करणे, सोबत आपले छंद ही ऑनलाईन स्वरूपात जोपासणे या साऱ्या गोष्टी करत आहेत. मात्र हे सारे ऑनलाईन करताना आपली ऑनलाईन सुरक्षितता कशी अबाधित राखली जाईल, त्यासाठी काय करणे आवश्यक आहे याच्या महत्त्वपूर्ण आणि हटके टिप्स ही मुलांनी रिस्पॉन्सिबल नेटीजन्सच्या कूल किड्स इन क्वारंटाईन या फेसबुकवरील ऑनलाईन सेशनमध्ये शेअर केल्या आहेत. लर्न फ्रॉम होम करताना सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा विद्यार्थ्यांनी सुरक्षितरित्या वापर कसा करावा याबद्दल सांगताना आप्लिमाहिती कोणत्याही व्यक्तीशी शेअर करू नये, आपला पासवर्ड सुरक्षित ठेवावा , आपण ज्या साईटवर माहिती शोधत आहोत ती साईट सुरक्षितआहे का याची खात्री करून घ्यावी अशा टिप्स या सेशनमध्ये सहभागी मुलांनी दिल्या. आपल्या पालकांना आपण इंटरनेटवर किंवा ऑनलाईन काय करत आहोत याची माहिती असायला हवी असा सल्ला ही त्यांनी दिला. एखादया अनोळखी व्यक्तीकडून किंवा साईटवरून मेसेज आल्यास त्याला लगेच रीस्पॉन्ड न करता त्याची माहिती पालकांना देणे आवश्यक असल्याचे ही मुलांकडून सांगण्यात आले.

लॉकडाऊनचा सुरुवातीचा काळ म्हणजे मज्जा वाटणाऱ्या मुलांना हा लॉकडाऊन वाढल्यानंतर पूर्ण दिवस करायचे काय हा प्रश्न पडला. मात्र विविध प्रकारची आणि विषयांवरची पुस्तके वाचणे, ऑनलाईन डान्स आणि गाणे यांचे क्लासेस अटेंड करणे, नवीन भाषा शिकणे, ऑनलाईन क्वीज आणि पझल्स सोडविणे अशासारखे छंद मुलांनी जोपासण्यास सुरुवात केली आणि पुढील काही काळात आनंदी राहण्यासाठी त्यांनी इतर मुलांना ही हेच मंत्र दिले आहेत. घरात शांत ,सुरक्षित , आनंदी राहिलो तर पुढील काळ ही पटकन निघून जाईल अशी प्रतिक्रिया मुलांनी दिली.

-------------------------------------------------

या काळात मोठ्यांकडे तर सगळ्यांचेच लक्ष आहे पण लहान मुलांच्या जगात काय चाललंय हे ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ही परिस्थिती ही लहान मुले उत्तम रीतीने सांभाळत असून डिजिटल आणि फिजिकल एम्पथी पाहून आश्चर्य आणि समाधान दोन्ही वाटते. मुलांच्या या जबाबदारीच्या जाणीवेसोबत या वेळी त्यांची निरागसता ही तितकीच जपली जाणे महत्त्वाचे आहे. हा संदेश या मुलांच्या माध्यमातून इतर अनेक मुलांना पोहचावा हाच उद्देश आहे.
- सोनाली पाटणकर, संस्थापक, रिस्पॉन्सिबल नेटीजन्स

Web Title: It is your responsibility to trust in the virtual world of online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.