भायखळा स्थानकाचे रूपडे पालटण्यास २०२१ उजाडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 03:12 AM2020-01-02T03:12:34+5:302020-01-02T03:12:43+5:30

- कुलदीप घायवट  मुंबई : देशातील सर्वाधिक जुन्या स्थानकांपैकी एक असलेल्या भायखळा स्थानकाचे रूप पालटण्यात येत आहे. या स्थानकाला त्याचे ...

It will take 2 turns to change the shape of the stray station | भायखळा स्थानकाचे रूपडे पालटण्यास २०२१ उजाडणार

भायखळा स्थानकाचे रूपडे पालटण्यास २०२१ उजाडणार

Next

- कुलदीप घायवट 

मुंबई : देशातील सर्वाधिक जुन्या स्थानकांपैकी एक असलेल्या भायखळा स्थानकाचे रूप पालटण्यात येत आहे. या स्थानकाला त्याचे १८५७ सालचे रूप दिले जात आहे. स्थानकातील नक्षी, दरवाजे, खिडक्या, छत, भिंती यांचा कायापालट करण्यात येत आहे. या कामासाठी आणखी एक वर्ष लागणार आहे.

सध्या स्थानकातील फलाट क्रमांक एकवर दुरुस्ती सुरू आहे. यामध्ये स्थानक प्रबंधक, आरपीएफ यांच्या कार्यालयाचे काम हाती घेतले असून, दरवाजे आणि भिंतींना नवीन झळाळी देण्याचे काम सुरू आहे.

स्थानकाच्या पश्चिमेकडे २६ कमानी आहेत. त्यावरील नक्षीकामाची डागडुजी सुरू आहे. तर, छतावरील कौले काढली असून साजेशी कौले लावणार आहेत. जुन्या तिकीट घराच्या आतील भागातील काम सुरू आहे.

भायखळा स्थानक हेरिटेज ग्रेड वनमध्ये येते. मुंबई हेरिटेज कमिटी, आय लव्ह यू मुंबई, आभा लांबा असोसिएशन यांच्यावतीने भायखळा स्थानकाला जुने रूप देण्याचे काम सुरू आहे.

या स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला कोणताही धक्का न पोहोचविता नवीन रूप दिले जाणार आहे. २०२१पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती आय लव्ह यू मुंबईच्या विश्वस्त शायना एन सी यांनी दिली.

कर्मचाऱ्यांना अडचणी
स्थानक प्रबंधक, आरपीएफच्या कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे काम करणाºया कर्मचारी वर्गाला दुसºया ठिकाणी हलवाले आहे. स्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एका ठिकाणी कार्यालय तयार केले आहे. त्यामुळे दररोजची महत्त्वाची कामे करताना कर्मचाºयांना अडचणी येत असल्याचे दिसून आले.

देशातील सर्वाधिक जुन्या स्थानकांपैकी एक भायखळा स्थानक आहे. १८५३ साली या स्थानकाची बांधणी लाकडाचा वापर करून केली. त्यानंतर १८५७ साली पुन्हा नव्याने बांधकाम केले. आताचे बांधकाम हे १८५७ सालचे बांधकाम आहे.

Web Title: It will take 2 turns to change the shape of the stray station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.