Join us  

अजित पवारांनीच गाढवाचा नांगर फिरवला, गोपीचंद पडळकरांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 8:39 PM

धनगर समाजाचे पालकमंत्री आहेत, त्यांना हटविण्याची मोहीम राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून होत आहे, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांना विचारण्यात आला होता.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष असल्याचा घणाघाण गोपीचंद पडळकर यांनी केला. 5 वर्षाच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं, तरी ते सांगेल, कोणता पक्ष जातीयवादी आहे, असे पडळकर यांनी म्हटलं.

मुंबई - पदोन्नतीमधील आरक्षण (Reservation in Promotion) रद्द करण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Goverment) असलेले मतभेद समोर आले आहेत. याबाबत, काँग्रेसच्या मंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी (Varsha) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील अध्यादेश मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर, उपमुख्यमंत्री आणि समितीचे प्रमुख यांच्यासमवेत काँग्रेसच्या प्रमुख मंत्र्यांची बैठकही झाली. याच पदोन्नतीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. 

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्रीपदावरुन हटविण्याची चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे. त्यावरुन, धनगर समाजाचे पालकमंत्री आहेत, त्यांना हटविण्याची मोहीम राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांकडून होत आहे, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वात जातीयवादी पक्ष असल्याचा घणाघाण गोपीचंद पडळकर यांनी केला. 5 वर्षाच्या पोराला झोपेतून उठवून जरी विचारलं, तरी ते सांगेल, कोणता पक्ष जातीयवादी आहे, असे पडळकर यांनी म्हटलं.  

पदोन्नती आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे पुढे आली. पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आहेत, भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत, एससी-एसटी आहेत, तसेच विशेष मागास प्रवर्गही आहे. या सर्वांच्या बाबतीत, ज्या समितीचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यांनी, या सर्व अधिकाऱ्यांच्या करिअरवर गाढवांचा नांगर फिरविण्याचं काम केलंय, हे सुस्पष्टपणे दिसतंय, असे प्रत्त्युत्तर पडळकर यानी दिलं आहे. 

पदोन्नती आरक्षण रद्दच्या निर्णयावरुन काँग्रेस नाराज

पदोन्नतीतील एससी-एसटी आरक्षण हटविण्याच्या मुद्यावर काँग्रेस नाराज आहे. या संदर्भातील अध्यादेश सरकारंन रद्द करावा अशी मागणी, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, नितीन राऊत आणि वर्षा गायकवाड या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर, नितीन राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कायदेशीर आणि प्रशासकीय बाजूंचा अभ्यास करुन सकारात्मक निर्णय होईल, असे राऊत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :गोपीचंद पडळकरकाँग्रेसअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसधनगर आरक्षण