२०१८-१९ वर्षांत ३.१२ लाख रक्त संग्रहित, आरोग्य विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 03:32 AM2019-10-02T03:32:56+5:302019-10-02T03:33:09+5:30

दर वर्षी १ आॅक्टोबर हा दिवस राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो.

Information on health department, collecting 3.12 lakh blood in 2-3 years | २०१८-१९ वर्षांत ३.१२ लाख रक्त संग्रहित, आरोग्य विभागाची माहिती

२०१८-१९ वर्षांत ३.१२ लाख रक्त संग्रहित, आरोग्य विभागाची माहिती

Next

मुंबई : दर वर्षी १ आॅक्टोबर हा दिवस राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ‘जीवनात एकदा तरी रक्तदान करा’ ही या वर्षाच्या राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनाची घोषणा आहे. मुंबईत २०१८-१९ या वर्षात १ हजार ८५० ऐच्छिक रक्तदान शिबिरांमधून ३.१२ लाख रक्त संग्रहित करण्यात आले.
ऐच्छिक रक्तदानासंबंधी जनजागृती मुळे ऐच्छिक रक्तदानातील प्रमाणात १९९८ मधील ४७ टक्क्यांवरुन २०१८-१९ मध्ये ९९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच रक्तातून पसरणाऱ्या संसर्गामध्येही लक्षणीय घट झाली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी याच्या अध्यक्षतेखाली व महानगर पालिका आयुक्त सुनिल धामणे याच्या उपस्थितीत सोमवारी महानगर पालिका मुख्यालयातील दुसरा मजला सभागृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
३१ रक्तदाते, ६ रक्तदान शिबीर आयोजक आणि ४ महाविद्यालयातील रेड रिबन क्लब यांचा यावेळी सत्कार करण्यात येईल.

Web Title: Information on health department, collecting 3.12 lakh blood in 2-3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.