'इंग्लडकडून झालेला भारताचा पराभव शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा'

By महेश गलांडे | Published: February 9, 2021 03:46 PM2021-02-09T15:46:44+5:302021-02-09T15:49:01+5:30

इंग्लंडच्या ४२० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला १९२ धावा करता आल्या. इंग्लंडनं हा सामना २२७ धावांनी जिंकला. ऑस्टेलयाला पराभूत केल्यानंतर मायेदशी जल्लोषात स्वागत झालेल्या टीम इंडियाचा पराभव सर्वांनाचा आश्चर्यकारक आहे

'India's defeat by England is proof of international conspiracy', Jitendra Awhad | 'इंग्लडकडून झालेला भारताचा पराभव शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा'

'इंग्लडकडून झालेला भारताचा पराभव शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा'

Next
ठळक मुद्देआज इंग्लंडकडून झालेला भारताचा पराभव हा भारतीय क्रिकेटला बदनाम करण्यासाठी शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा आहे, असे ट्विट आव्हाड यांनी केलंय. आव्हाड यांच्या यांच मजेशीर किंवा खोचक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मुंबई - ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर मायदेशात पहिलीच कसोटी मालिका खेळणाऱ्या टीम इंडियाचे 'तारे जमी पर!' आले आहेत. भारतात येण्यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर आशिया खंडातील खेळपट्टीचा अभ्यास केलेल्या इंग्लंडच्या संघानं पहिली कसोटी सहज जिंकली. जेम्स अँडरसनच्या ( James Anderson) एका षटकानं टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवले. शुबमन गिल व विराट कोहली यांची अर्धशतकी खेळी वगळता भारतासाठी काहीच चांगलं झालं नाही. भारताच्या या दारुण पराभवाला शेतकरी आंदोलनावरुन उठलेल्या आंतरराष्ट्रीय बदनामीच्या कारस्थानशी जोडण्यात आलंय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन रामजीवि असं म्हटलंय.    

India vs England, 1st Test : तारे जमी पर!; टीम इंडियाचा इंग्लंडकडून दारूण पराभव

इंग्लंडच्या ४२० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला १९२ धावा करता आल्या. इंग्लंडनं हा सामना २२७ धावांनी जिंकला. ऑस्टेलयाला पराभूत केल्यानंतर मायेदशी जल्लोषात स्वागत झालेल्या टीम इंडियाचा पराभव सर्वांनाचा आश्चर्यकारक आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन अमेरिकन पॉपस्टार रिहाना हिने ट्विट केल्यानंतर देशाभरातील सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर ही ट्विट मोहिमच चालवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज खेळाडूंनीही देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी ट्विट केलं. त्यावरुन, ट्विटरवर मोठं वादंग उठलं होतं. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे. 

आज इंग्लंडकडून झालेला भारताचा पराभव हा भारतीय क्रिकेटला बदनाम करण्यासाठी शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा आहे, असे ट्विट आव्हाड यांनी केलंय. आव्हाड यांच्या यांच मजेशीर किंवा खोचक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, आपल्या ट्विटमध्ये रामजीवि, असे म्हणत मोदींच्या आंदोलनजीवी या शब्दावरुनही टोमणा मारण्यात आला आहे.

रिहाना अन् मीना हॅरीस यांचं ट्विट

आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल केला त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा झाली. रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. मीना हॅरिसनं लिहिलं की, आपण सगळ्यांनी भारतात इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा हिंसाचार याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. ट्विटरवरून गेल्या २४ तासांत रिहानाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, भारताच्या संसदेने व्यापक चर्चा आणि संवादानंतर कृषी क्षेत्राच्या संबंधित सुधारणा करणारे कायदे मंजूर केले आहेत. हा कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लवचिकता आणि विस्तीर्ण बाजारपेठ मिळू शकेल. ही सुधारणा आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शेतीचा मार्ग आहेत. भारतातील काही भागातील शेतकऱ्यांचा छोटा गट या सुधारणांशी सहमत नाही. भारत सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद सुरू केला आहे. या प्रयत्नात आतापर्यंत अकरा फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री सहभाग घेत आहेत, केवळ सरकारच नाही,तर पंतप्रधानांकडूनही कृषी कायद्याला स्थगित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करताना #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda हा हॅशटॅग वापरला आहे. 

Web Title: 'India's defeat by England is proof of international conspiracy', Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.