Independent Census of OBCs to be held in the state ?; Demand by Chhagan Bhujbal in Vidhan Sabha pnm | राज्यात होणार ओबीसींची स्वतंत्र जनगणना?; विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये एकमत 

राज्यात होणार ओबीसींची स्वतंत्र जनगणना?; विधानसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये एकमत 

ठळक मुद्देकेंद्राने साथ दिली नाही तरी महाराष्ट्रात ओबीसी जनगणना करुन देशाला दाखवून देऊया जितेंद्र आव्हाडांनी केली सूचना भुजबळांकडून ओबीसींच्या स्वतंत्र्य जनगणनेची मागणी, विरोधी पक्षानेही दिलं समर्थन

मुंबई - विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओबीसींच्या जनगणनेवरुन चर्चा झाली. यावेळी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी अशी मागणी केली. या मागणीला विरोधकांनीही समर्थन दिलं. 

यावेळी विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, १९९० पासून ओबीसी समाजाच्या जनगणेची मागणी होतेय, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव दिला होता, अनेक मुख्यमंत्र्यांनीही प्रस्ताव दिला होता, त्यावर नरेंद्र मोदींची सही होती, देशात 54 % ओबीसींची संख्या आहे, त्यामुळे ओबीसी जनगणना होणे आवाश्यक आहे असं त्यांनी सांगितले. 

तर चांगल्या पद्धतीने ओबीसी जनगणना होणं आवश्यक आहे, पंतप्रधानांना जात नसते पण नरेंद्र मोदी हे स्वत: ओबीसी समाजाचे आहेत. छगन भुजबळांनी केलेली मागणी योग्य आहे. ओबीसी जनगणेला आमचं समर्थन आहे, हा धोरणात्मक निर्णय आहे, पंतप्रधान योगायोगाने ओबीसी असल्याने आपण सर्वांनी पंतप्रधानांकडे जाऊन जातनिहाय जनगणनेची मागणी करु, लवकरच पंतप्रधानांना भेटू असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. 

तसेच विरोधी पक्षनेते फडणवीस आपल्यासोबत आहेत, ओबीसी जनगणनेला त्यांची साथ आहे, केंद्राची साथ नसली तरी आपण महाराष्ट्रात ओबीसी जनगणना करुन देशाला दाखवून देऊया. महाराष्ट्र हे जगातील पहिलं राज्य आहे, ज्यामध्ये शाहू महाराजांनी वंचित घटकांना पहिल्यांदा आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणलं असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. 
 

English summary :
Chhagan bhujbal demands separate census for obc in Vidhan Sabha, Opposition leader Devendra Fadnavis also support to bhujbal Demand, as soon as possible we will meet PM Narendra Modi Said Fadnavis

Web Title: Independent Census of OBCs to be held in the state ?; Demand by Chhagan Bhujbal in Vidhan Sabha pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.