माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर तरुणींना अश्लील स्पर्श; विकृताची तक्रारीअभावी सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:25 IST2020-02-07T05:09:40+5:302020-02-07T06:25:07+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर एका विकृताने तरुणींना अश्लील स्पर्श केला.

Indecent touch to young women at Matunga Road railway station; Discharge due to malpractice complaint | माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर तरुणींना अश्लील स्पर्श; विकृताची तक्रारीअभावी सुटका

माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर तरुणींना अश्लील स्पर्श; विकृताची तक्रारीअभावी सुटका

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर एका विकृताने तरुणींना अश्लील स्पर्श केला. मात्र एकाही तरुणीने रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली नसल्याने या गुन्ह्यातून सध्या तरी त्याची सुटका झाली आहे. रजिउर खान (३७) असे या विकृताचे नाव आहे.
मूळचा उत्तर प्रदेशातील आणि सध्या वडाळा येथे राहणाऱ्या रजिउरने २५ जानेवारी रोजी माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर महिलांच्या पार्श्वभागाला स्पर्श करणे, त्यांचे चुंबन घेणे असे अश्लील चाळे करून पळ काढला होता. त्यानंतर २६ जानेवारीलाही महिला प्रवाशांसोबत त्याने असेच अश्लील वर्तन केले होते.

प्रवाशांचे पाकीट, मोबाइल चोरी या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली खानला बुधवारी अटक केली. सखोल चौकशीअंती त्याने चोरीचा गुन्हा आणि अश्लील चाळे करीत असल्याचे कबूल केले. त्या वेळी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर तो तरुणींना अश्लील स्पर्श करताना दिसला. मात्र त्या तरुणींनी तक्रार दाखल केलेली नाही. त्यांनी तक्रार केल्यास या प्रकरणी खानवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले. दरम्यान, चोरीच्या गुन्ह्यातही त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

Web Title: Indecent touch to young women at Matunga Road railway station; Discharge due to malpractice complaint