Join us

बच्चे कंपनीसाठी डिजिटल खजिना असलेल्या कॅराव्हॅनचे लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 14:01 IST

बच्चे कंपनीसाठी डिजिटल खजिना असलेल्या या आगळ्या वेगळ्या डिजिटल कॅराव्हॅनचे लोकार्पण करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देबच्चे कंपनीसाठी डिजिटल खजिना असलेल्या या आगळ्या वेगळ्या डिजिटल कॅराव्हॅनचे लोकार्पण करण्यात आले आहे.  बसमध्ये 13 टॅब, 13 टच स्क्रीन टीव्ही व शैक्षणिक चित्रपटांसाठी मोठी टीव्ही स्क्रीन उपलब्ध.तब्ब्ल 4000 गोष्टीच्या पुस्तकांचा खजिना आहे.

मुंबई - बच्चे कंपनीसाठी डिजिटल खजिना असलेल्या या आगळ्या वेगळ्या डिजिटल कॅराव्हॅनचे लोकार्पण मंगळवारी (10 सप्टेंबर) राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यां आनंदीनी ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत ही सुविधा स्थानिक आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून उपलब्ध झाली आहे. व्हॅनमध्ये शैक्षणिक व्हिडिओचा संग्रह, चार हजार गोष्टीच्या ई पुस्तकांचा खजिना, अंध मुलांसाठी हजारो ध्वनी पुस्तके, पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी भाषेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम असा डिजिटल खजिना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

डिजिटल कॅराव्हॅन बसमध्ये 13 टॅब, 13 टच स्क्रीन टीव्ही व शैक्षणिक चित्रपटांसाठी मोठी टीव्ही स्क्रीन उपलब्ध आहे. शाळांमध्ये जाऊन बस मुलांना हा खजिना उपलब्ध करुन देणार आहे. राज्यातील हा आगळा वेगळा व पहिला असा उपक्रम ठरावा असा आहे. या कार्यक्रमाला नगरसेविका अलका केरकर, सपना म्हात्रे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

वैशिष्ट्ये

1) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सिनेमे 

2) अंध मुलांसाठी हजारो ध्वनी पुस्तके  (1500 गोष्टी)

3) सर्व शासकीय योजना एका क्लिकवर 

4) मुंबई महानगर पालिकेची परिपत्रके 

5) थेट माहितीची देवाण-घेवाण 

6) शैक्षणिक व्हिडिओचा संग्रह 

7) पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम मराठी व इंग्रजी भाषेमध्ये 

10) तब्ब्ल 4000 गोष्टीच्या पुस्तकांचा खजिना

 

टॅग्स :आशीष शेलारमुंबईशाळाविद्यार्थीडिजिटल