कोस्टल रोडच्या बोगद्यात अपघात झाल्यास १० क्रॉस पॅसेजेसमधून तत्काळ मिळणार मदत; एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाऊन ‘रेस्क्यू’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 11:47 IST2025-10-01T11:46:33+5:302025-10-01T11:47:06+5:30

बोगद्यातील १० क्रॉस पॅसेजेसमुळे तात्काळ मदत पोहोचू शकली.  बोगद्यात एखादी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी हे क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत.

In case of an accident in the Coastal Road tunnel, immediate help will be available through 10 cross passages; ‘Rescue’ will be done by going from one tunnel to another | कोस्टल रोडच्या बोगद्यात अपघात झाल्यास १० क्रॉस पॅसेजेसमधून तत्काळ मिळणार मदत; एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाऊन ‘रेस्क्यू’ 

कोस्टल रोडच्या बोगद्यात अपघात झाल्यास १० क्रॉस पॅसेजेसमधून तत्काळ मिळणार मदत; एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाऊन ‘रेस्क्यू’ 

मुंबई : कोस्टल रोडच्या भुयारी मार्गात मागील काही महिन्यात २ ते ३ अपघात झाले आहेत. मागच्या आठवड्यात एका वाहनाने पेट घेतल्यामुळे प्रचंड घबराट निर्माण झाली. परंतु, बोगद्यात लागलेल्या आगीची माहिती वेळेवर मिळाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता येणे शक्य झाले. बोगद्यातील १० क्रॉस पॅसेजेसमुळे तात्काळ मदत पोहोचू शकली.  बोगद्यात एखादी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी हे क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत. या क्रॉस पॅसेजेसमुळे संपूर्ण बोगद्यातून प्रवास न करता या क्रॉस पॅसेजेसमधून एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करणे शक्य असल्याचे समोर आले आहे.


कोस्टल रोडवरील प्रवासासाठी टनेल बोअरिंग मशिनने २.०७२ किलोमीटरचे दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. यात हे १० क्रॉस पॅसेजेस असून त्यांची लांबी ११ मीटर आहे. जवळपास साडेचार मीटर उंच या पॅसेजेसमधून आपत्कालीन परिस्थतीत वाहने, प्रवाशांना बाहेर काढता येणे शक्य आहे. बोगद्याच्या भिंती या अतिउच्च तापमान सहन करू शकतील, अशा बांधल्या आहेत. त्यामुळे एखाद्या वाहनाला आग लागल्याची घटना घडल्यास ९०० सेल्सिअसपर्यंत तापमान बोगदा व भिंती सहन करू शकतात. बोगदयाला ३७५  मि.मी. जाडीचे कॉंक्रीटचे अस्तर लावण्यात आले असून, त्यावर अग्नीप्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत अग्नीरोधक फायरबोर्ड लावण्यात आले आहेत. 
या बोगद्यांच्या बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षेसाठी ‘’क्रॅश बॅरियर’’ देखील उभारण्यात आले आहेत. याशिवाय प्रियदर्शनी पार्क येथील बोगद्याच्या  प्रवेश द्वाराजवळ रुग्णवाहिका आणि  इमर्जन्सी फायर ब्रिगेड व्हेईकल तैनात करण्यात आले आहे.

व्हिडीओ इन्सिडेंट कॅमेरे
ऑनलाइन - १३१ ऑफलाइन - ८ 
पीटीझेड कॅमेरे 
ऑनलाइन १८  ऑफलाइन - ६ 
एटीसीसी
ऑनलाइन -३ ऑफलाइन- १
एनपीआर स्पीड कॅमेरे
ऑनलाइन - ३ (डावी मार्गिका) 
एनपीआर स्पीड कॅमेरे 
(उजवी मार्गिका) - 
ऑनलाइन - ४  ऑफलाइन - ४

फायर हायड्रंट ३ किमी लांब
कोस्टलच्या बोगद्यात आगीची दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत म्हणून बोगद्यात ३ किमी लांबीचे फायर हायड्रंट बसवण्यात आले आहेत. अग्निशमन दल आपत्ती प्रतिसाद वाहनाचा वापर करून तत्काळ आग विझवता येईल. यासाठी प्रियदर्शनी पार्क येथे पालिकेकडून बोगद्याचे सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या टेक्निकल इमारतीजवळ फायर टॅंक बांधण्यात आले आहेत. यामध्ये सव्वाचार लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title : कोस्टल रोड सुरंग: क्रॉस पैसेज दुर्घटना के बाद त्वरित बचाव सुनिश्चित करते हैं

Web Summary : कोस्टल रोड सुरंग में दुर्घटना के बाद त्वरित बचाव के लिए क्रॉस पैसेज हैं। हाल की घटनाओं के बाद, ये मार्ग सुरंगों के बीच तेजी से पहुंच को सक्षम करते हैं, जिससे कुशल बचाव अभियान सुनिश्चित होता है। आग सुरक्षा उपाय भी किए गए हैं।

Web Title : Coastal Road Tunnel: Cross Passages Ensure Quick Rescue After Accidents

Web Summary : Coastal Road's tunnel has cross passages for quick accident rescue. Following recent incidents, these passages enable rapid access between tunnels, facilitating efficient rescue operations. Fire safety measures, including heat-resistant walls and fire hydrants, are also in place.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.