मुंबईतील टीआरपी गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे जाणे अशक्य! अधिकारी, विधि तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:59 AM2020-10-22T08:59:09+5:302020-10-22T08:59:55+5:30

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रमाणे हा तपास सीबीआयकडे देण्यासाठी काही जण जरी सर्वोच्च न्यायालयात गेले तरी या प्रकरणात मुंबई पोलिसांची बाजू भक्कम असल्याने तो नाकारला जाण्याची त्यांना खात्री आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीसह अन्य दोन स्थानिक चॅनेलवर गुन्हा दाखल केला. आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक केली आहे.

Impossible to go to CBI to investigate TRP crime in Mumbai! Opinions of officers and legal experts | मुंबईतील टीआरपी गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे जाणे अशक्य! अधिकारी, विधि तज्ज्ञांचे मत

मुंबईतील टीआरपी गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे जाणे अशक्य! अधिकारी, विधि तज्ज्ञांचे मत

Next

जमीर काझी 

मुंबई : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने उत्तर प्रदेशात दाखल बनावट रेटिंग प्रकरणाचा (टीआरपी) तपास ताब्यात घेतला असला तरी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी दाखल तपास त्यांच्याकडे वर्ग होणे अशक्य असल्याचे मत वरिष्ठ अधिकारी आणि विधि तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रमाणे हा तपास सीबीआयकडे देण्यासाठी काही जण जरी सर्वोच्च न्यायालयात गेले तरी या प्रकरणात मुंबई पोलिसांची बाजू भक्कम असल्याने तो नाकारला जाण्याची त्यांना खात्री आहे. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीसह अन्य दोन स्थानिक चॅनेलवर गुन्हा दाखल केला. आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक केली आहे. त्याशिवाय ‘रिपब्लिक’च्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. एक पथक लखनऊला जाणार होते. त्याचवेळी सोमवारी लखनऊ पोलिसांनी स्थानिक चॅनेलने दिलेल्या तक्रारीनुसार टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आता ‘रिपब्लिक’ मुंबईचा तपासही सीबीआयने करण्याची मागणी केली आहे.

तपास महत्वपूर्ण टप्प्यात
टीआरपी घोटाळ्यातील गुन्हा दाखल असलेल्या ‘रिपब्लिक’ने तो हटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारत उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली आहे. मुंबई पोलिसांचा तपास महत्त्वपूर्ण टप्प्यात आहे. त्यामुळे तो बदलणे अशक्य आहे.
- इकबाल शेख,
निवृत्त साहाय्यक आयुक्त

मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे, अनेकांना अटक केली आहे, त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन कोणी याचिका दाखल केली तरी सर्वोच्च न्यायालय मुंबई पोलिसांना अन्य राज्य वगळता महाराष्ट्र याच्या मर्यादित तपास कायम ठेवू शकतो.
- अ‍ॅड. संदेश मोरे, ज्येष्ठ वकील,
उच्च न्यायालय

टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन चॅनेल्सची नावे समोर
टीआरपी घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मंगळवारी दिनेश विश्वाकर्मा आणि रामजी वर्मा यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत आणखी दोन वाहिन्यांची नावे समोर आली. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. भारत ऑडियन्स ब्रॉडकास्ट रिसर्च सेंटरया संस्थेला मदत करणाऱ्या हंसा रिसर्च ग्रुपचा माजी कर्मचारी विशाल भंडारी याच्या अटकेनंतर हा घोटाळा उघडकीस आला. यापूर्वी या प्रकरणात फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या तीन वाहिन्यांची नावे समोर आली आहेत.
 

Web Title: Impossible to go to CBI to investigate TRP crime in Mumbai! Opinions of officers and legal experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.