'मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन', शेवाळेंविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 09:05 IST2019-04-18T09:04:39+5:302019-04-18T09:05:43+5:30

राहुल शेवाळे हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते सध्या भाजपावासी झाले आहेत. त्यानंतरच, सुप्रिया सुळे आणि त्यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे.

'I'm not a contractor, I will come out in the house', Supriya Sule will file a defamation suit. | 'मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन', शेवाळेंविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार

'मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन', शेवाळेंविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीलोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपा नेते राहुल शेवाळे यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे यांची एक कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये बदनामी केल्यास घरात घुसून ठोकून काढेन, असे सुप्रिया सुळेंच्या आवाजातील व्यक्ती म्हणताना दिसून येते.  

राहुल शेवाळे हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते सध्या भाजपावासी झाले आहेत. त्यानंतरच, सुप्रिया सुळे आणि त्यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्याविरोधात हे षडयंत्र असल्याचे सांगत मी राहुल शेवाळेंच्या विरोधात डीफिमेशन केस दाखल करणार असल्याचे सुळे यांनी म्हटले. तसेच, ऐन निवडणुकांवेळी आणि मतदानाच्या तोंडावरच असे प्रकार का घडतात, एका महिलेला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आरोपही सुळे यांनी केला आहे. दरम्यान, सध्या सुप्रिया सुळेंची ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत असून सोशल मीडियावर यावरुन उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. 


 
कथित व्हायरल ऑडिओ क्लीपमधील मजकूर - 

सुप्रिया सुळे : राहुल, मी तुम्हाला कधी अपमानित केलं हो?
राहुल शेवाळे : हॅलो
सुप्रिया सुळे : राहुल, सुप्रिया सुळे बोलतेय, तुम्हाला कधी अपमानित केलं हो? 
राहुल शेवाळे : हां ताई.
राहुल शेवाळे : नाही.

सुप्रिया सुळे : तुमचं स्टेटमेंट आहे, की पवार, सुळेंनी अपमानित केलं म्हणून...

राहुल शेवाळे : हां.. नाही नाही...

सुप्रिया सुळे : तुम्हाला कधी अपमानित केलं मी?

राहुल शेवाळे : दोन पेपरला चुकीची स्टेटमेंट आली आहेत. एक सकाळला आलंय.. एक मटाला आलंय. मटाला तुमचं आणि दादाचं नाव आलंय.

सुप्रिया सुळे : एक मिनिट होल्ड करा.... हा हा, नाय तुमच्या नावानं स्टेटमेंट आहे. विजय कोळसेंचं नाव कसं तुम्ही आणताय मध्ये?

राहुल शेवाळे : नाय, नाय तसं नाय, म्हनलं तुम्हाला मी

सुप्रिया सुळे : तुम्ही भाजपमध्ये गेलाय. एक लक्षात ठेवा. राहुळ शेवाळे सुप्रिया सुळेच्या नादी लागू नका. मी कॉन्ट्रक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढीन. मी गंभीर आहे. माझी बदनामी केली ना, तर अब्रुनुकसानीचा दावा करीन. माझ्यासारखी वाईट बाई नाही. माझ्यासारखी खरी बाई नाहीय. लक्षात ठेवा रेकॉर्ड केलं तरी चालेल.

राहुल शेवाळे : मी स्टेटमेंट केलेलं नाही, चुकीचं स्टेटमेंट त्यांनी छापलं आहे.

सुप्रिया सुळे : एक लक्षात ठेवा. माझ्या नादी लागू नका. मी तुमच्याशी आतापर्यंत गोड वागलेय. आय एम अ व्हेरी ऑनेस्ट लेडी, माझी बदनामी केली तर काय येऊन करायचं, ते मी करीन.  

Web Title: 'I'm not a contractor, I will come out in the house', Supriya Sule will file a defamation suit.