अग्निशमन’च्या बचावकार्यात बेकायदा पार्किंगमुळे अडथळा आल्यास थेट गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:25 IST2026-02-03T14:22:23+5:302026-02-03T14:25:01+5:30

आग किंवा अन्य आपत्कालीन घटनेच्या वेळी बचावकार्यात वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे अग्निशमन दलास अडथळे येत आहेत. त्यामुळे घटनास्थळी अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलिस ठाण्यात थेट ‘एफआयआर’ नोंदविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Illegal parking obstructs fire department's rescue operations, a direct crime | अग्निशमन’च्या बचावकार्यात बेकायदा पार्किंगमुळे अडथळा आल्यास थेट गुन्हा

अग्निशमन’च्या बचावकार्यात बेकायदा पार्किंगमुळे अडथळा आल्यास थेट गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: आग किंवा अन्य आपत्कालीन घटनेच्या वेळी बचावकार्यात वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे अग्निशमन दलास अडथळे येत आहेत. त्यामुळे घटनास्थळी अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर पोलिस ठाण्यात थेट ‘एफआयआर’ नोंदविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

पालिका आयुक्त  भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दुर्घटनास्थळी बचाव कार्यास जाताना अग्निशमन दलास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यांच्या कडेला  अनेक वाहने बेकायदा उभी  केलेली असतात. त्यामुळे जीवित व वित्तहानी वाढण्याची भीती असते. अशा वाहनांमुळे अग्निशमन कार्यात विलंब झाल्याचे आढळल्यास  अग्निशमन वाहनावरील अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अग्निशमनचे कार्य पूर्णपणे संपल्यानंतर बचावकार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांचे नोंदणी क्रमांकासह छायाचित्रे काढून वरिष्ठांच्या परवानगीने संबंधित पोलिस ठाण्यात  एफआयआर  नोंदवावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

...तर नागरिकांची तक्रार पोलिसांकडे करणार वर्ग

या कारवाईमुळे बेकायदा पार्किंगबाबत नागरिकांकडूनही अग्निशमन दलाकडे तक्रार येण्याची आहे. त्याकरिता प्रशासनाने कार्यप्रणाली ठरविली आहे. अशाप्रकारच्या बेकायदा पार्किंगबाबत जर नागरिकांनी तक्रार केली, तर संभाव्य तक्रार संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस विभाग व संबंधित विभाग कार्यालयाकडे  वर्ग करून तक्रारदारास माहिती देण्याचे निर्देशही अग्निशमन दलास दिले आहेत. अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी न पोहोचल्यास हानी वाढण्याची भीती असते.

Web Title : अग्निशमन बचाव में अवैध पार्किंग बाधा, अब सीधे एफआईआर दर्ज होगी।

Web Summary : मुंबई नगर पालिका अवैध पार्किंग के कारण अग्निशमन बचाव कार्यों में बाधा डालने वाले वाहन मालिकों के खिलाफ एफआईआर दर्ज करेगी। अग्निशमन अधिकारी उल्लंघन करने वाले वाहनों की तस्वीरें लेंगे और पुलिस में शिकायत दर्ज कराएंगे। नागरिकों की शिकायतें पुलिस और यातायात विभागों को भेजी जाएंगी।

Web Title : Illegal parking obstructing fire rescue will now lead to direct FIR.

Web Summary : Mumbai's municipality will file FIRs against vehicle owners obstructing fire rescue operations due to illegal parking. Fire officials will photograph violating vehicles and register complaints with police. Citizen complaints will be forwarded to police and traffic departments.