सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला परवानगी दिल्यानंतर १ मार्च २०२१ पासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वप्रथम कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यानंतर अनेक नेते, मंत्री, दिग्गजांनी लस घेतल्याचे समोर येत आहे. दरम्यान, आपल्या शिस्तबद्धतेसाठी ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी शनिवारी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून फोटोही शेअर केला आहे."आज मी जे.जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. सर्वजण लवकरच ही लस घेतील अशी अशा करतो. या कठिण काळात सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली असून त्यांचा अभिमान आहे," असा संदेशही तुकाराम मुंढे यांनी आपल्या फोटोसह लिहिला आहे. "कोरोना प्रतिबंधात्मक लसीत्या विकासाठी हातभार लावून आणि लसीकरणासाठी इतर देशांना सहाय्य करून भारतानं मोलाची कामगिरी बजावली आहे," असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 16:48 IST
Corona Virus Vaccine : तुकाराम मुंढे यांच्यापूर्वी रतन टाटा यांनीदेखील घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
तुकाराम मुंढे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस, म्हणाले...
ठळक मुद्देजे. जे रुग्णालयात जाऊन मुंढे यांनी घेतली लसतुकाराम मुंढे यांच्यापूर्वी रतन टाटा यांनीदेखील घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस