Join us

'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले

By संतोष कनमुसे | Updated: October 28, 2025 18:33 IST

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन जु्ळ्या बहिणींच्या सुसाईट नोटचा पुरावा दाखवला. या मुलींनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी महिला आयोगालादेखील तक्रार केली होती. त्याचा पुरावा थेट सुषमा अंधारे यांनी सादर केला. 

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरुन आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत.  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट ५० कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा केला होता. तसेच नाईक निंबाळकर यांच्या वकिलांनीदेखील सुषमा अंधारे यांना इशारा दिला होता. दरम्यान, आज अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निंबाळकर यांच्याविरोधातील पुरावे दाखवले.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन जु्ळ्या बहिणींच्या सुसाईट नोटचा पुरावा दाखवला. या मुलींनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी महिला आयोगालादेखील तक्रार केली होती. त्याचा पुरावा थेट सुषमा अंधारे यांनी सादर केला. 

मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

सुषमा अंधारे म्हणाल्या,नागटिळक आणि राजेशिंदे कुणाचे पीए आहेत ते सांगा. खासदार म्हणजे अमूक एक खासदार नाही. तर हे दोन अमूक लोकं कुणाचे पीए आहेत ते सांगा. खालचे दोन लोकं जे तिला तिच्या गावावरुन, आडनावावरुन, जात समूहावरुन तिला टॉर्चर करत होते ते एपीआय जायपात्रे आणि पीएसआय अशा लोकांना चौकशीच्या कक्षात आणावं हा माझा कालही शब्द होता आणि आजही आहे. मी शब्द फिरवला नाही.

अनेक गुन्हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रभावाखाली दाखल होतात. असं म्हटल्यावर त्यांनी लगेच मानहानीचा दावा दाखल केला. मी काल एका मुलीचा फोटो दाखवला होता आणि तिला हजरही केलं होतं. खरंतर या जुळ्या बहिणी आहेत. या दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोघींनी सुसाईट नोट लिहिली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संपर्क येतो का ते स्पष्ट होईल, असे सांगत अंधारे यांनी पत्र दाखवले. 

पत्रात नेमके काय म्हटलंय ते वाचून दाखवले

"पप्पा, तुमची खूप आठवण येते. मागच्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाहिलं. तुमची अवस्था डोळ्यांसमोरुन जात नाही. तुमच्यासारख्या खंबीर मनाच्या व्यक्तीच्या डोळ्यांत पाणी बघून आम्हाला हतबल झाल्यासारखं वाटत आहे. मम्मी आणि आपल्या घरातले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत, असे या पत्रात आहे. हे पत्र चार पानी आहे. दिगंबर आवगणे यांच्यावर निंबाळकरांनी फसवण्याचा प्रयत्न केला असा आरोप आगवणेंच्या दोन्ही मुलींनी केला आणि त्यांनी आत्महत्याही करण्याचा प्रयत्न केला असा आरोप सुषमा अंधारे म्हणाल्या. 

अंधारेंचा महिला आयोगावरही निशाणा

दरम्यान, काल महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावर अंधारे यांनी टीका केली. महिला आयोगाच्या कामावर काही बोलण्यासारखं उरलंच नाही. कुणाचं तरी राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते. त्या आयोगाने साताऱ्यातील महिला डॉक्टरला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चाकणकरांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या बाजूने पत्रकार परिषद घेतल्याचं दिसत आहे, असंही अंधारे म्हणाल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sushma Andhare: Unfazed by threat, reveals evidence against Nimbalkar.

Web Summary : Sushma Andhare presented evidence against Ranjitsinh Naik Nimbalkar regarding a Falton suicide case. She refuted defamation claims, highlighting a suicide note and accusing Nimbalkar of influence in related crimes. Andhare also criticized the Women's Commission's handling of the matter.
टॅग्स :सातारा परिसरशिवसेनाभाजपारणजितसिंह नाईक-निंबाळकर