'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 08:32 IST2025-12-21T08:21:10+5:302025-12-21T08:32:21+5:30
हसीन यांनी हे आवाहन त्यांनी नुकत्याच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओनंतर केले आहे. वर्षानुवर्षे न्यायाच्या शोधात आहे परंतु अद्याप न्याय मिळालेला नाही असं तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
मुंबईतील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तान मिर्झा हिने बलात्कार, जबरदस्तीने लग्न, हत्येचा प्रयत्न आणि मालमत्ता हडप करण्याच्या आरोपात न्याय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मदत मागितली आहे. १९९६ मध्ये, ती अल्पवयीन होती, तेव्हा तिचे तिच्या मामाच्या मुलाशी जबरदस्तीने लग्न लावण्यात आल्याचा तिने आरोप केला. त्याच माणसाने तिच्यावर बलात्कार केला, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आणि तिच्या ओळखीचा गैरवापर करून तिची मालमत्ता हडप केल्याचेही तिन म्हटले आहे.
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
हसीन यांच्या माहितीनुसार, आरोपी पुरुषाने तिच्या आधी आठ वेळा लग्न केले होते. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हसीन मस्तान मिर्झा म्हणाली की, जेव्हा तिच्यासोबत हे सर्व घडले तेव्हा ती फक्त एक लहान मुलगी होती आणि तिला कोणताही आधार मिळाला नाही. माझ्यावर बलात्कार झाला, माझी हत्या करण्याचा प्रयत्न झाला, बालविवाह करण्यास भाग पाडले गेले, माझी मालमत्ता हिसकावून घेण्यात आली आणि माझी ओळख लपवण्यात आली. जर कायदे कडक असतील तर लोक गुन्हे करण्यास घाबरतील. तिने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले.
हसीनने नुकत्याच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओनंतर ही विनंती केली आहे. ती अनेक वर्षांपासून न्यायासाठी भटकत आहे, परंतु अद्याप न्याय मिळालेला नाही, असंही तिने सांगितले.
तिहेरी तलाक कायद्याचे कौतुक
हसीन यांनी पंतप्रधान मोदींनी आणलेल्या तिहेरी तलाक कायद्याचे कौतुक केले. तो कायदा महिलांसाठी एक महत्त्वाचा आणि योग्य पाऊल असल्याचे म्हटले. इस्लाममध्ये तिहेरी तलाकचा गैरवापर होत असल्याचे तिने म्हटले. मोदी सरकारने हा कायदा करून महिलांना दिलासा दिला. लैंगिक गुन्हे आणि जबरदस्ती विवाहांच्या प्रकरणांमध्ये त्वरित न्याय मिळावा यासाठी कठोर कायदे करण्याची मागणीही तिने केली.