HRSP: सध्या जुन्याच कंत्राटदाराला मुदत वाढवून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:55 IST2026-01-06T13:55:13+5:302026-01-06T13:55:18+5:30
HRSP Number Plate: नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुढील आदेश मिळेपर्यंत मुदतवाढ दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

HRSP: सध्या जुन्याच कंत्राटदाराला मुदत वाढवून
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांची मुदत डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. त्यामुळे सध्याच्या कंत्राटदाराकडेच काम ठेवावे किंवा नवीन कंत्राटदार निवडण्याबद्दल अभिप्राय मिळावा, असे पत्र परिवहन विभागाने शासनाला पाठवले आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुढील आदेश मिळेपर्यंत मुदतवाढ दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील ५८ प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झालेल्या सुमारे २.१० कोटी जुन्या वाहनांना एचएसआरपी लावण्यासाठी तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
पुन्हा निविदा प्रक्रिया राबवावी लागणार
वाहनांना एचएसआरपी बसवण्यासाठी परिवहन विभागाने ३० एप्रिल, ३० जून आणि १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबरनंतर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली होती.
मुदतवाढीसह तीनही कंत्राटदारांना दिलेल्या कंत्राटाची मुदत संपली आहे. यामुळे नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट्सच्या सर्व प्रक्रियेदरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी याच कंत्राटदारांना मुदतवाढ दिल्याचे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.