कोणत्या पदार्थांमध्ये किती साखर? राज्य मंडळाच्या शाळांमध्ये शुगर बोर्ड स्थापनेच्या सूचना; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:02 IST2025-08-07T13:02:15+5:302025-08-07T13:02:43+5:30
...त्यामुळे शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना कोणत्या पदार्थात किती कॅलरीज आणि किती साखरेचे प्रमाण आहे ते समजण्यास मदत होईल.

कोणत्या पदार्थांमध्ये किती साखर? राज्य मंडळाच्या शाळांमध्ये शुगर बोर्ड स्थापनेच्या सूचना; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पाऊल
मुंबई : साखरेच्या अतिसेवनामुळे वाढणारा मधुमेह रोखण्यासाठी राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ (Sugar Board) स्थापन करण्याचे आदेश ३० जूनला राज्य मंडळाने दिले. त्यामुळे शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांना कोणत्या पदार्थात किती कॅलरीज आणि किती साखरेचे प्रमाण आहे ते समजण्यास मदत होईल.
मधुमेह, लठ्ठपणा...
प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने मुलांमध्ये विविध आजार बळावतात. टाइप-२ प्रकारचा मधुमेह, लठ्ठपणा, दंतविकार व पचना संबंधीचे विकार वाढत आहेत. त्यामुळे सरकारने प्रत्येक शाळेमध्ये शुगर बोर्ड स्थापन करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आहाराबाबत जागृती होण्यास मदत होईल.
आरोग्यदायी पर्याय
हे टाळा हे खावे
गोड पदार्थ ओट्स, फळे, नट्स
सॉफ्ट ड्रिंक्स लिंबूपाणी, नारळ पाणी, ताक
स्नॅक फूड मखाणे, भाजलेले शेंगदाणे,
पॅकबंद ज्युस घरगुती ताजे फळरस, फळे
गोड पदार्थ चॉकलेट्स खजूर, मनुका, गोडवा
फ्लेवर्ड दूध हळद टाकून घरगुती दूध
गोड दही ताजे फळ
शाळांमध्ये तज्ज्ञ व्यक्तींकडून जागृती सुरू केली आहे. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या दैनंदिन खाण्यापिण्यात बदल करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहे.
राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, शिव शिक्षण संस्था
आमच्या भागातील सर्व शाळांची ऑनलाइन बैठक घेऊन मंगळवारी शुगर बोर्डबाबत सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना मधुमेहापासून जागरूक करणे हा उद्देश असावा, हेदेखील अधोरेखित केले आहे.
संजय जावीर,
शिक्षण निरीक्षक, पश्चिम विभाग
मुलांनी घरी बनवलेल्या आणि नैसर्गिक पदार्थांवर अधिक भर द्यावा. पॅकेजिंग केलेले फूड टाळावे. फळांवर अधिक भर हवा. तसेच शाळांमध्ये अधिकाधिक शारीरिक कवायती झाल्या पाहिजे. म्हणजे पचनक्रियादेखील सुलभ होईल. मुलांना फूड लेबल वाचायला शिकवा.
आरती भगत, आहार तज्ज्ञ