...मग शरद पवारांची भूमिका अचानक बदलली कशी?; भाजपाने काढला चिमटा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 10:16 AM2020-01-28T10:16:42+5:302020-01-28T10:21:01+5:30

आता राज्यात सत्तेत आल्यानंतर पवारांची भूमिका अचानक बदलली आणि ते व त्यांच्या पक्षाचे नेते काही व्यक्ती व संघटनांवर आरोप करू लागले आहेत

... How did Sharad Pawar's role suddenly change ?; BJP asked question | ...मग शरद पवारांची भूमिका अचानक बदलली कशी?; भाजपाने काढला चिमटा 

...मग शरद पवारांची भूमिका अचानक बदलली कशी?; भाजपाने काढला चिमटा 

Next
ठळक मुद्देएल्गार परिषद प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवावा अशी मागणीकेंद्राने घाईघाईने एल्गार परिषदेचा तपास काढून घेतलायाचा अर्थ आपल्या पत्रात उपस्थित केलेल्या शंका खऱ्या होत्या - शरद पवार

मुंबई - कोरेगाव भीमा दंगलीच्या तपास प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

यावेळी बोलताना माधव भांडारी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात काही व्यक्ती आणि संघटनांवर आरोप करणे सुरु केले आहे. या दंगलीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावरही शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या जबाबदार नेत्यांनी टीका केली आहे. मात्र या याप्रकरणी तपास करणाऱ्या चौकशी आयोगापुढे सादर केलेल्या शपथपत्रात मात्र पवार यांनी आपण या संदर्भात कोणा व्यक्ती अथवा संघटनेवर आरोप करू इच्छित नाही असे स्पष्टपणे नमूद केले होते असा आरोप त्यांनी केला आहे. 

तसेच आता राज्यात सत्तेत आल्यानंतर पवारांची भूमिका अचानक बदलली आणि ते व त्यांच्या पक्षाचे नेते काही व्यक्ती व संघटनांवर आरोप करू लागले आहेत, हे आश्चर्यजनक आहे. पवार यांनी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे ( एसआयटी)  सोपवावा, अशी मागणी केली होती. सध्या हा तपास राज्य पोलिसच करत आहेत. हेच पवार या घटनेची चौकशी एनआयएकडे सोपविण्याचा केंद्राच्या निर्णयावरही टीका करत आहेत, मग पवार यांचा नेमका विश्वास आहे तरी कोणावर असा सवालही भाजपाने उपस्थित केला आहे. याच शपथपत्रात पवार यांनी समाज माध्यमांवर निर्बंध आणण्याची मागणी केली होती असंही माधव भांडारी यांनी नमूद केलं आहे.  

दरम्यान, केंद्राने घाईघाईने एल्गार परिषदेचा तपास काढून घेतला, याचा अर्थ आपल्या पत्रात उपस्थित केलेल्या शंका खऱ्या होत्या असा होतो. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: गृहमंत्रीही होते. त्यांनी विधानसभेत त्यावेळी निवेदन केले होते. त्यात त्यांनी कुठेही कथित आरोपी माओवादी होते, असा उल्लेख केलेला नव्हता. ज्या चौकशा केल्या, त्यात पी. बी. सावंत यांनी आपण जे बोललो नाही. ते आपले स्टेटमेंट म्हणून दाखल करून घेतले आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सगळ्याची चौकशी करण्याची गरज होती, असे शरद पवारांनी सांगितले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

...तर केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त होईल?; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

'एका पराभवाने खचून जाणारी मी नाही, भाजपा सोडणार नाही'

चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर; राष्ट्रवादीने केली जहरी टीका 

Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त 

धक्कादायक...! देशात 5 महिन्यांत चाईल्ड पॉर्नचा आकडा 25 हजारांवर; मुंबई, पुणे आघाडीवर

 

Web Title: ... How did Sharad Pawar's role suddenly change ?; BJP asked question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.