On Chavan's statement disagreement in Mahavikas Aghadi, criticism by NCP | चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर; राष्ट्रवादीने केली जहरी टीका 

चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर; राष्ट्रवादीने केली जहरी टीका 

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येत सरकार स्थापन केलं मात्र सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या विधानामुळे तीन पक्षातील वाद समोर येताना दिसत आहे. अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकीचं आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. 

याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, तिन्ही पक्षाने सरकार बनवण्यासाठी दिल्लीत, मुंबईत बैठका झाल्या, किमान समान कार्यक्रम आखण्यात आला. त्यावर शिवसेनेनं नव्हे तर सर्वच पक्षाने स्वाक्षरी केली आहे. साहजिकच हे सरकार संविधानाच्या आधारे चालणार आहे. घटनेचा कुठेही अपमान होणार नाही ही आमच्या तिन्ही पक्षाची भूमिका आहे असं नवाब मलिक म्हणाले. 

...तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू - अशोक चव्हाण

महाविकास आघाडी म्हणजे मल्टीस्टारर सिनेमा?; अजित पवारांचं भन्नाट उत्तर

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले होते की, सोनिया गांधी यांनी सांगितलं की, संविधानाच्या चौकटीत सरकार चाललं पाहिजे असं लिहून घ्या, जर संविधानाच्या चौकटीत सरकार न चालल्यास सरकारमधून बाहेर पडू असं स्पष्ट दिल्लीच्या नेत्यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही उद्धव ठाकरेंची चर्चा केली. त्यांनीही आम्हाला संविधानाच्या चौकटीतच सरकार चालेल अशी ग्वाही दिली त्यानंतर आम्ही सत्तेत आलो असं सांगितले. 

'काहीही लिहून दिलेलं नाही', अशोक चव्हाणांच्या सिनेमात शिवसेनेची एंट्री 

'हा मल्टीस्टारर सिनेमा यशस्वी होणार', चव्हाणांच्या वक्तव्यानंतर थोरांतांचे स्पष्टीकरण

दरम्यान, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो नाही, तत्वासाठी आलो आहे, त्यामुळे त्याप्रकारे काम सुरु आहे. ठरल्याप्रमाणे सरकार काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे मी काही चुकीचं बोललो हे वाटत नाही असं सांगत अशोक चव्हाणांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचं स्पष्ट केले. 

...म्हणून आम्ही तीन हिरो एकत्र येत सरकार बनवलं; अशोक चव्हाणांनी सांगितलं सत्तेचं गुपित

कोणताही लेखी करार नाही
शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रम ठरविला असून त्यावर सर्वांच्या सह्या आहेत. याशिवाय कोणताही लेखी करार झालेला नाही.

हा तर हॉरर सिनेमा
अशोक चव्हाण यांच्या ‘राज्यातील सरकार हे मल्टीस्टारर सिनेमा’ या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला़ हा मल्टीस्टार सिनेमा नसून हॉरर सिनेमा आहे़ तो किती दिवस पहायचा हे जनताच ठरवील परंतु हा हॉरर सिनेमा लवकरच बंद होणार असा टोला त्यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला. 
 

Web Title: On Chavan's statement disagreement in Mahavikas Aghadi, criticism by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.