नवरात्रोत्सवामध्ये गृहिणी जपताहेत फिटनेसचा मंत्र! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:09 IST2025-09-29T13:05:42+5:302025-09-29T13:09:40+5:30

नवरात्रोत्सव हा देवीच्या जागरणाबरोबरच गृहिणींसाठी फिटनेसची पर्वणी ठरत आहे. कुटुंब आणि कामात व्यस्त असणाऱ्या गृहिणी गरब्यातील नृत्याद्वारे आपला फिटनेस जपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Housewives are chanting the mantra of fitness during Navratri! | नवरात्रोत्सवामध्ये गृहिणी जपताहेत फिटनेसचा मंत्र! 

नवरात्रोत्सवामध्ये गृहिणी जपताहेत फिटनेसचा मंत्र! 

मुंबई : नवरात्रोत्सव हा देवीच्या जागरणाबरोबरच गृहिणींसाठी फिटनेसची पर्वणी ठरत आहे. कुटुंब आणि कामात व्यस्त असणाऱ्या गृहिणी गरब्यातील नृत्याद्वारे आपला फिटनेस जपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
घर आणि नोकरीत व्यस्त असणाऱ्या गृहिणीला तिच्या शारीरिक फिटनेसकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, तर काही महिला रूढी, परंपरेत स्वतःला हरवून घेतात. घर, मुलांचा सांभाळ याला प्राधान्य देतात, तर काही महिलांना कुटुंबाबरोबरच ऑफिसलाही प्राधान्य द्यावे लागते. दैनंदिन कामात स्वतःसाठी जिम दूरच. घरच्या घरी साधा योगा करण्यासाठीही वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून काही गृहिणींनी नवरात्रोत्सवाची संधी साधण्याचे ठरवले आहे.

महिनाभरापासून पूर्वतयारी सुरू होती. त्यात गरब्याच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत स्त्री-पुरुष थिरकताना दिसले. डान्स हा फिटनेस राखण्याचाच एक मार्ग आहे. व्यायामाचे विविध प्रकार हे डान्सच्या स्टेप्समध्ये दिसून येतात. त्यामुळे महिलांना या स्टेप्स करणे तुलनेने सोपे जाते. एवढेच नव्हे तर त्याच्या तयारीसाठी अनेक महिला शिकवणीलाही जातात. देवीच्या जागरणातील आनंद-उत्साहाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीही जपली जाते. गरब्याच्या माध्यमातून शारीरिक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय व्यायामही होतो. त्यामुळे या काळात अधिकाधिक महिला उत्साहाने गरबा खेळताना दिसून येतात.


कुटुंब व ऑफिसमुळे स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. मात्र, नवरात्रोत्सवात गरब्याचा मनसोक्त आनंद घेत फिजिकल फिटनेसकडेही लक्ष देते.
पूजा पाटील, गृहिणी

घरच्या दैनंदिन कामकाजात स्वतःकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी गरब्याच्या माध्यमातून का होईना फिटनेस कसा जपता येईल, यासाठी प्रयत्न करते.
सेजल शहा, गृहिणी

महिलांना गरबा खेळण्याची हौस असते. शिवाय आपला फिजिकल फिटनेसही याद्वारे कसा जपता येईल, हे बघण्याकडेही महिलांचा कल जास्त आहे.
अनुजा हेगडे, गरबा शिक्षिका

Web Title : नवरात्रि में गृहणियां गरबा नृत्य से फिटनेस मंत्र अपना रही हैं।

Web Summary : व्यस्त गृहणियां नवरात्रि के गरबा नृत्य का उपयोग फिट रहने के लिए कर रही हैं। यह एक मजेदार कसरत है, जो शारीरिक और मानसिक कल्याण प्रदान करता है। कई लोग कक्षाओं में भाग लेते हैं और पारिवारिक कर्तव्यों के बीच फिटनेस को प्राथमिकता देते हैं। गरबा ऊर्जा और आनंदमय व्यायाम प्रदान करता है।

Web Title : Housewives embrace fitness mantra during Navratri festival through Garba dance.

Web Summary : Busy housewives are using Navratri's Garba dance to stay fit. It's a fun workout, offering physical and mental well-being. Many attend classes and prioritize fitness amidst family duties. Garba provides energy and joyful exercise.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.