नवीन प्रकल्पातील घरे परवडणा-या श्रेणीतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 05:58 PM2020-09-30T17:58:31+5:302020-09-30T17:58:53+5:30

कोरोनाकाळात सुरू झालेल्या प्रकल्पांतील ७२ टक्के घरे परवडणारी

The houses in the new project are in the affordable category | नवीन प्रकल्पातील घरे परवडणा-या श्रेणीतील

नवीन प्रकल्पातील घरे परवडणा-या श्रेणीतील

Next

मुंबई : कोरोना संक्रमणाच्या काळात कोसळलेल्या गृहनिर्माणाला चालना देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून प्रयत्न सुरू असून गेल्या तीन महिन्यांत नव्या गृहप्रकल्पांची मुहूर्तमेढसुध्दा रोवली जात आहे. कोरोनापूर्व काळापेक्षा या प्रकल्पांची संख्या कमी असली तरी नव्या प्रकल्पांमध्ये सर्वाधिक भर हा परवडणा-या घरांवर दिला जात आहे. मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांत ७ हजार ८९० नव्या घरांची कामे सुरू झाली असून त्यापैकी ७२ टक्के घरे ही परवडणारी म्हणजे ८० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची आहेत.

गेल्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये २९ हजार ५२० घरांची विक्री झाली आहे. कोरोनापूर्व काळात म्हणजेच जानेवारी ते मार्च, २०२० मध्ये विक्री झालेल्या घरांची संख्या ४५,२०० इतकी होती. त्यापैकी सर्वाधिक ९ हजार २०० घरे ही मुंबई महानगर क्षेत्रातली आहेत. मुंबई महानगर, पुणे, दिल्ली, बंगळूरू , हैद्राबाद, चैन्नई, कोलकत्ता या सात शहरांमध्ये ३२ हजार ५३० नव्या घरांची उभारणी सुरू झाली आहे. त्यात सर्वाधिक गृहनिर्माण हैद्राबादमध्ये होत असून त्याखालोखाल कोलकत्ता आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. त्यापैकी २३ हजार २९० घरे ही परवडणा-या श्रेणीतील आहेत. एप्रिल ते जून या तिमाहीत जेमतेम १३९० घरांची कामे सुरू झाली होती आणि १२७३० घरे विकली गेली होती. त्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांतील संख्या बांधकाम व्यावसायिकांसाठी दिलासादायक आहे. या सात शहरांमध्ये आजही बांधकाम पूर्ण झालेली ६ लाख ५६ हजार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.  

महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात घसघशीत सवलत दिली आहे. त्याशिवाय बांधकाम व्यावसायिकसुध्दा किंमती कमी करून ग्राहकांना आकर्षित करत आहेत. गृह कर्जांचे व्याज दरही कमी झाले आहेत. त्यामुळे घर खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे. मात्र, कोरोना संक्रमण वाढत असताना आणि पित्रृपंधरवडा असतानाही मुंबई महानगरांत झालेले घरांचे खरेदी विक्री व्यवहार बांधकाम व्यवसायासाठी दिलासादायक असल्याचे मत अँनराँक प्राँपर्टीच्या अनुज पुरी यांनी व्यक्त केले.

 

Web Title: The houses in the new project are in the affordable category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.