मुंबई - पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस भरती २०१९ साठी एसईबीसीच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यांना दिलासा देण्यासाठी गृहमंत्रालयाने ४ जानेवारी २०२१ रोजी काढलेला जीआर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.याबाबत माहिती देताना अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्यात पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे. या पोलीस भरतीमध्ये ज्या एसईबीसीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी ४ जानेवारी २०२१ रोजी काढण्यात आलेला शासनादेश (जीआर) रद्द करून राज्य शासनाने तो २३ डिसेंबर २०२० चा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ मिळावा म्हणून त्या पद्धतीचं शुद्धिपत्रक सरकारकडून लवकरात लवकर काढण्यात येईल.राज्यात पोलीस शिपाई भरतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असून, या भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
पोलीस भरतीचा जीआर रद्द, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 16:52 IST