मुंबई - शहरातील चुनाभट्टी येथील धावजी केणी मार्गावरील साईबाबा मंदिरजवळ 19 वर्षाच्या मुलीला मद्यधुंद चालकाने धडक देऊन गाडीखाली चिरडले. या हीट अँड रन प्रकरणातील अपघातात युवतीचा जागीचा मृत्यू झाला असून दोन महिलादेखील जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी फिर्यादी महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चुनाभट्टी येथील धावजी मार्गावरून रात्री ठीक 8.45 वाजण्याच्या सुमारास एमएच 05 बीजे 3920 क्रमांकाची असलेली कार दत्त मंदिर जवळून व्ही. एन. पूरव मार्गावर जात होती. या कारमधील मद्यधुंद चालकाने बाजारात खरेदी करुन घरी चालत जाणाऱ्या दोन मुली व एका महिलेला धडक दिली. त्यामध्ये अर्चना पारठे वय (19वर्षे) या मुलीला चालकाने स्वदेशी मिल चाळ नंबर 113 येथे फरफटत नेत गाडीखाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर बाजूने जाणाऱ्या दोन महिलाही जखमी झाल्या. या जखमी महिलांना उपचारासाठी शेजारील दळवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चुनाभट्टी पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले आहे. गाडीत चालकासोबत तिघेजण होते, त्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गु.र.क्र. 315/19 कलम 304(2), 279, 34 भा.दं.वि. सह 184, 185,188, 134 (अ), (ब) मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Hit and Run! An alcoholic driver drives a young girl to death
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.