Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:34 IST2025-05-24T12:29:50+5:302025-05-24T12:34:26+5:30

Accident : बुधवारी रात्री मुंबईतील पार्क साईट परिसरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला

Hit And Run: A speeding tanker hit a bike in Vikhroli; The biker died on the spot, the driver is absconding. | Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार

Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार

बुधवारी रात्री मुंबईतील पार्क साईट परिसरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. पाण्याच्या टँकरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीस्वाराकहा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पळून गेला, असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

घरी परतताना झाला अपघात

मेहफुज हाश्मी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचा मित्र सलमान रात्री ११:४५च्या सुमारास जेवण घेऊन टागोर नगरहून पल्सर मोटरसायकलवरून घरी परतत होते. एलबीएस रोडवरील वसंत रबर फॅक्टरीच्या जवळ येताच, एका वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

टँकरची ही धडक इतकी जोरदार होती की, मोटारसायकल टँकरच्या बंपरमध्ये अडकली आणि बऱ्याच दूरपर्यंत फरफरटत ओढली गेली. या अपघातात सलमानच्या छातीला गंभीर दुखापत झाली.

उपचारांदरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू 

या अपघातानंतर मेहफुज हाश्मीने ताबडतोब दोन मित्रांना मदतीसाठी बोलावले आणि तत्काळ सलमानला महात्मा फुले रुग्णालयात नेले. मात्र, पहाटे २:०० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पार्क साईट पोलिसांनी अज्ञात टँकर चालकाविरुद्ध कलम ३०४(अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) आणि भारतीय न्याय संहितेच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

Web Title: Hit And Run: A speeding tanker hit a bike in Vikhroli; The biker died on the spot, the driver is absconding.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.