Join us

अति घाई जीव घेई! राजावाडी रुग्णालयाच्या नर्सचा अपघाती मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 15:18 IST

नर्स सीमा संजय रासम (वय ५७) यांचे कुर्ला येथे सकाळी ६:४५ वाजता झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देसध्या राजावाडी रुग्णालयात बायोमेट्रिक पगाराशी लिंक केल्याने सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचण्याची चढाओढ सुरू असतेया घटनेने राजावाडी रुग्णालयात हळहळ व्यक्त होत आहे. सीमा रासम या देखील बायोमेट्रिक करण्यासाठी घाईघाईने जात असताना पाठी मागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने खाली कोसळल्या आणि जागीच त्यांचा मृत्युमुखी पडल्या.

मुंबई - घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या नर्स सीमा संजय रासम (वय ५७) यांचे कुर्ला येथे सकाळी ६:४५ वाजता झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेने राजावाडी रुग्णालयात हळहळ व्यक्त होत आहे. 

सध्या राजावाडी रुग्णालयात बायोमेट्रिक पगाराशी लिंक केल्याने सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचण्याची चढाओढ सुरू असते. सीमा रासम या देखील बायोमेट्रिक करण्यासाठी घाईघाईने जात असताना पाठी मागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने खाली कोसळल्या आणि जागीच त्यांचा मृत्युमुखी पडल्या. या घटनेची माहिती मिळताच म्युनसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम,सहचिटणीस रंजना नेवाळकर, अजय राऊत, वैद्यकीय अधीक्षक विद्या ठाकूर, दक्षता समितीचे प्रकाश वाणी,चंदूभाऊ चव्हाण,चंद्रपाल चंदेलिया यांनी रुग्णालयात धाव घेत रासम कुटुंबातील सदस्यांना धीर दिला.यावेळी झालेल्या शोक सभेत बायोमेट्रिक परिणामामूळे वेळेवर पोहोचले पाहिजे या दडपणाखाली कामावर येणाऱ्या रासम यांचा अपघातीमृत्यू झाला.या प्रकरणात प्रशासनाला धडा शिकविण्यात यावा असे मत अध्यक्ष बाबा कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोकसभेत मांडले आहे. 

टॅग्स :अपघातहॉस्पिटलमृत्यू