पालिकेत हायटेकचा वाद

By Admin | Updated: August 3, 2014 00:49 IST2014-08-03T00:49:43+5:302014-08-03T00:49:43+5:30

वर्षभरापासून चर्चेत असलेली पालिकेची हायटेक अॅप सेवा अखेर आजपासून सुरू झाली आह़े

High tech dispute in the corporation | पालिकेत हायटेकचा वाद

पालिकेत हायटेकचा वाद

मुंबई : वर्षभरापासून चर्चेत असलेली पालिकेची हायटेक अॅप सेवा अखेर आजपासून सुरू झाली आह़े मात्र प्रशासनाच्या या प्रकल्पाचे श्रेय महापौर सुनील प्रभू लाटत असल्याचा निषेध करीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन या अॅपचे स्वतंत्र उद्घाटन केल़े त्यामुळे पालिकेतील हायटेक अॅप राजकारण चांगलेच रंगात आले आह़े
पाणीपट्टी, मालमत्ता कर, परवान्याचे नूतनीकरण आणि ऑनलाइन तक्रारी करण्यासाठी पालिकेने मोबाइल अॅप आणले आह़े यामुळे तासन्तास रांगेत उभे न राहता नागरिकांना मोबाइलवरूच आपले बिल भरता येणार आह़े या अॅपच्या लोकार्पणासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापौरांनी विरोधी पक्षांचा रोष ओढावून घेतला़
विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ, मनसेचे संदीप देशपांडे आणि समाजवादीचे रईस शेख या गटनेत्यांनी कार्यक्रमाच्या आयोजित वेळेच्या अर्धा तास आधी या अॅपचे उद्घाटन करून महापौरांची फजिती केली़ ही सुविधा सुरू होण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला असताना त्याचे श्रेय पक्ष कसा लाटू शकतो? दीनानाथ नाटय़गृहाच्या कार्यक्रमालाही महायुतीचा रंग आला होता, असा संतापाचा सूर गटनेत्यांनी 
लावला़ (प्रतिनिधी) 
 
या अॅपचा फायदा कसा?
अॅण्ड्रॉइड मोबाइल व आय फोनवरून हा अॅप डाऊनलोड करून ही सुविधा उपलब्ध होणार आह़े विनामूल्य असलेल्या या अॅपमध्ये मालमत्ता कर, पाणीपट्टी, कोणत्याही प्रकारचा परवाना अशा सुविधा नागरिकांना मिळणार आहेत़ कुठेही, कधीही व केव्हाही या सेवेचा लाभ आपल्या मोबाइलद्वारे नागरिकांना घेता येणार आह़े त्यामुळे तासन्तास नागरी सुविधा केंद्रावर तिष्ठत राहण्याच्या कटकटीतून सुटका होणार आह़े
 
आतार्पयत नागरिकांना पालिकेच्या हेल्पलाइनवर नागरी तक्रारी करता येत होत्या़ मात्र अनेक वेळा हा कॉल व्यवस्थित झाला का? त्याचा प्रतिसाद व दखल याबाबत संभ्रम होता़ परंतु आता ही सेवा मोबाइलवर उपलब्ध होणार असून या अॅपद्वारे नागरिक आपल्या तक्रारीही पालिकेकडे पाठवू शकणार आहेत़ 

 

Web Title: High tech dispute in the corporation