Join us

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 14:59 IST

मुंबई पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुंबई पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. अमृता धनोआ आणि रिचा सिंग अशी अटक केलेल्या अभिनेत्रींची नावं आहेत.

मुंबई - मुंबई पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. गोरेगावमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मिळत आहे. अमृता धनोआ आणि रिचा सिंग अशी अटक केलेल्या अभिनेत्रींची नावं आहेत. यामधील रिचा सिंग ही मॉडेल म्हणून ओळखली जाते. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईसाठी पोलिसांनी सापळा रचला. ग्राहक असल्याचं सांगत पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर याप्रकरणी अमृता धनोआ आणि रिचा सिंग या दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डी स्वामी यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. 

 

महत्त्वाच्या बातम्या

भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थक पदाधिकाऱ्याला मारहाण; दानवे, महाजनांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

भूकंप शब्द बदलला अन् राजकीय भूकंप टळला; वडेट्टीवारांची नाराजी दूर

मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय, भाजपा पराभूत 

जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडे बोल

शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात थेट जमा होणार 15 हजार; आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना

 

 

टॅग्स :मुंबई पोलीसगुन्हेगारीमुंबईअटकसेक्स रॅकेट