हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्ट नाराज! ‘मध्यम’ निर्देशांकावर व्यक्त केले असमाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:16 IST2026-01-21T14:03:21+5:302026-01-21T14:16:19+5:30

प्रदूषणाबाबत २३ जानेवारीला पुन्हा सुनावणी

High Court upset over air quality Expresses dissatisfaction over moderate index | हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्ट नाराज! ‘मध्यम’ निर्देशांकावर व्यक्त केले असमाधान

हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्ट नाराज! ‘मध्यम’ निर्देशांकावर व्यक्त केले असमाधान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील हवेची गुणवत्ता  ‘मध्यम’ पातळीवर असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले आहे. शहरातील वाढते वायू प्रदूषण आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी न्यायालयाने २३ जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. काही वर्षांत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत असला, तरी न्यायालयाने या परिस्थितीवर समाधानी नसल्याचे स्पष्ट केले.

हवेचा दर्जा  खालावत असल्याची दखल घेत उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल केली होती. त्यानंतर  महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषण रोखण्यासाठी  उपाययोजना राबवण्याचे निर्देश  दिले होते.  बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ, वाढती वाहतूक आदी नियंत्रण आणण्यावर न्यायालयाने भर दिला होता.  

महापालिकेचा दावा

महापालिकेने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. शहरातील विविध भागांतील बांधकामस्थळांची तपासणी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर  कारवाई,  आच्छादन वापरणे अशा उपाययोजना करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मागील काही वर्षांच्या तुलनेत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात काही प्रमाणात सुधारणा झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.  

मुंबईची हवा गुणवत्ता सुधारली

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक नोंदविण्यात आला. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यासोबत हवेतील प्रदूषके वाहून गेल्याने हवेच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले. 
तत्पूर्वी दक्षिण भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवेत ओलावा आला होता. परिणामी प्रदूषके हवेत अडकून पडल्याने प्रदूषित नोंदविण्यात आली होती. आता वाऱ्याची दिशा, गती बदलल्याने दर्जाही सुधारला आहे. दरम्यान,  नोंदविण्यात आलेला समाधानकारक दर्जा किती दिवस टिकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या वतीने कारवाई सुरूच आहे.

येथे दर्जा समाधानकारक

परिसर     गुणवत्तेचा निर्देशांक

  • भायखळा    ६१
  • चेंबूर    ७५
  • विमानतळ टी २    ९७
  • घाटकोपर    ९९
  • कांदिवली पूर्व    ९७
  • कांदिवली प.    ९९
  • भांडूप    ७२
  • मालाड प.    ६३ 
  • माझगाव    ८३
  • मुलुंड    ७८
  • कुलाबा    ८९
  • पवई    ५४
  • वरळी    ८७
  • सायन    ९१

Web Title : वायु गुणवत्ता से हाईकोर्ट नाखुश, असंतोष व्यक्त किया

Web Summary : मुंबई उच्च न्यायालय 'मध्यम' वायु गुणवत्ता से असंतुष्ट। सुधार के नगरपालिका के दावों के बावजूद, अदालत असंतुष्ट है। प्रदूषण नियंत्रण उपायों और प्रगति की समीक्षा के लिए 23 जनवरी को सुनवाई, निर्माण धूल और यातायात प्रबंधन पर ध्यान केंद्रित किया गया।

Web Title : High Court Unhappy with Air Quality, Expresses Dissatisfaction

Web Summary : Mumbai High Court dissatisfied with 'moderate' air quality. Despite municipal claims of improvement, the court remains unconvinced. Hearing set for January 23rd to review pollution control measures and progress, focusing on construction dust and traffic management.