दुबईत अडकलेल्या १९ वर्षीय मुलीला उच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:00 AM2020-03-19T04:00:31+5:302020-03-19T04:00:41+5:30

याचिकाकर्ती भारतीय आहे. तर मुलगी अमेरिकेत जन्माला आल्याने ती अमेरिकन आहे.

High court give Relief to 19-year-old girl, who Stuck in Dubai | दुबईत अडकलेल्या १९ वर्षीय मुलीला उच्च न्यायालयाचा दिलासा

दुबईत अडकलेल्या १९ वर्षीय मुलीला उच्च न्यायालयाचा दिलासा

Next

मुंबई : ती (याचिकाकर्ती मुलगी) १९ वर्षांची आहे आणि ती दुबईत अडकली आहे. तिच्याबरोबर कुटुंबातील एकही सदस्य नाही. त्यामुळे तिला मुंबईत कुुटुंबीयांकडे परतण्यासाठी व्हिसा देणे भाग आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने दुबईत अडकलेल्या १९ वर्षीय मुलीला व तिच्या आईला दिलासा दिला आहे.
‘हे काम खरेतर इंडियन डिप्लोमॅटिक कमिशनने करणे आवश्यक होते. मात्र, दुर्दैवाने त्यांनी याचिकाकर्तीने केलेली विनंती मान्य केली नाही,’ असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने इमिग्रेशन ब्युरोला त्या मुलीला मुंबईत परतण्यासाठी व्हिसा देण्याचा आदेश दिला.
या आदेशामुळे पायंडा पडला जाणार नाही. कारण या केसमधील तथ्य आणि सत्यता पडताळून व्हिसा देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
इमिग्रेशन ब्युरो आणि दुबईमधील इंडियन डिप्लोमॅटिक मिशन यांनी मनमानी कारभार करत मुलीला व्हिसा नाकारला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलीला व्हिसा नाकारण्यात आला, असे याचिकेत म्हटले आहे.
याचिकाकर्तीच्या म्हणण्यानुसार, याचिकाकर्ती भारतीय आहे. तर मुलगी अमेरिकेत जन्माला आल्याने ती अमेरिकन आहे. मुलीने मुंबईतून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर ती पुढील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेली. आता तिला परत यायचे आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिला भारतात परतण्याचा व्हिसा नाकारण्यात आला आहे.
तिला व्हिसा मिळावा, यासाठी दुबई येथील इंडियन डिप्लोमॅटिक मिशनशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली, असे याचिकाकर्तीने म्हटले.

Web Title: High court give Relief to 19-year-old girl, who Stuck in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.