हायअलर्ट! मुंबईत दीड हजारांहून अधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:41 AM2020-04-14T03:41:03+5:302020-04-14T03:41:13+5:30

दिल्लीत सहभागींपैकी ५० जण कोरोना पॉझिटिव्ह, संसर्गाचा आकडा वाढतोय

HiAlert! More than 1.5 thousand patients in Mumbai | हायअलर्ट! मुंबईत दीड हजारांहून अधिक रुग्ण

हायअलर्ट! मुंबईत दीड हजारांहून अधिक रुग्ण

Next

मुंबई : मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून सोमवारी राज्यात मुंबई शहरात सर्वाधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता शहर - उपनगरातील संख्या १,५४० वर पोहोचली असून मुंबईचा एकूण बळींचा आकडा १०१ वर पोहोचला आहे. परिणामी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जवळपास ४०० परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहे. आता प्रशासनाने टास्क फोर्सची स्थापना केली असून येत्या काळात शहर उपनगरावर अधिक कठोर निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यात २२९ रुग्ण तर मुंबई १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत ५ ते १२ एप्रिलदरम्यान प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये संशयित कोरोना (कोविड-१९) रुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या ८० क्लिनिकमध्ये ३ हजार ८५ लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी, १ हजार १८५ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील ३२ हजार ६४५ इमारतींच्या आवारांमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार निजंर्तुकीकरण करण्यात आले आहे. त्यात शासकीय व निमशासकीय, मनपा इमारती, रुग्णालय, दवाखाने, कोविड बाधित रुग्णांची घरे, अलगीकरण संस्थांचा समावेश आहे.
मुंबईत सोमवारी नोंद झालेल्या नऊ मृत्यूंपैकी ७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते तर दोन मृत्यूंमध्ये वार्धक्य हे कारण आहे. ८७ टक्के मृत्यूंमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार हे दीर्घकालीन आजार आहेत.

दिल्लीत सहभागींपैकी ५० जण कोरोना पॉझिटिव्ह, संसर्गाचा आकडा वाढतोय
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत १४ तर प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.

Web Title: HiAlert! More than 1.5 thousand patients in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.