हॅलो, मी भारतीय दूतावासातून बोलतोय...; अटकेचा बनाव अन् सुटकेसाठी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:21 AM2024-04-12T11:21:17+5:302024-04-12T11:21:57+5:30

अटकेचा बनाव अन् सुटकेसाठी फसवणूक

Hello, I am speaking from Indian Embassy...; Forgery of arrest and fraud for release | हॅलो, मी भारतीय दूतावासातून बोलतोय...; अटकेचा बनाव अन् सुटकेसाठी फसवणूक

हॅलो, मी भारतीय दूतावासातून बोलतोय...; अटकेचा बनाव अन् सुटकेसाठी फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : ‘हॅलो, मी भारतीय दूतावासातून बोलतोय... तुमच्या मुलाला अटक झाली आहे. सुटकेसाठी ८० हजार रुपये पाठवा,’ असा कॉल करून फसवणूक करणारी टोळी डोके वर काढत असल्याचे कांजूरमार्ग येथील घटनेतून समोर येत आहे. तेथील ६८ वर्षीय वृद्धाची अशाप्रकारे ८० हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

कांजूरमार्ग येथे राहणाऱ्या वृद्धाचा ४३ वर्षीय मुलगा कामानिमित्त दुबईत असतो. लाकडाच्या आयात-निर्यातचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या कार्यालयात चार ते पाच कर्मचारी आहेत. ३० मार्चला दुपारी त्यांना कॉल आला. फोन करणाऱ्याने तो भारतीय दूतावासातून बोलत असल्याचे सांगून, मुलाला अटक झाल्याचे सांगितले. त्यांनी मुलाला फोन देण्यास सांगताच त्यांना रडण्याचा आवाज आला. त्यामुळे ते घाबरले. मुलाच्या सुटकेसाठी ८० हजार रुपये द्या. पैसे न दिल्यास मुलाला आयुष्यभर कारागृहात राहावे लागणार असल्याचे सांगताच त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याच्या खात्यावरून  ८० हजार रुपये ‘गुगल पे’द्वारे पाठवले. पैसे पाठवतात फोन कट झाला. 

बराच वेळ काहीच प्रतिसाद न आल्याने अर्ध्या तासाने त्यांनी मुलाला फोन केला.  मुलगा दुबईत सुखरूप असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी घडलेली घटना मुलाला सांगताच त्यानेही पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. तसेच तत्काळ १९३० वर देखील संपर्क करत तक्रार दिली. पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. फसवणुकीची रक्कम आनंद कुमार नावाच्या बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. 

‘व्यवहार करू नका’
  परदेशात काम करणाऱ्या मुलांची ही टोळी माहिती घेते. त्यानंतर, अशाप्रकारे त्यांच्या पालकांना कॉल करून मुलांच्या तसेच नातेवाइकांबाबत खोटी माहिती देत  पैसे  उकळत असल्याचा संशय असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
 नागरिकांनी अशा जाळ्यात 
अडकू नये. तसेच खातरजमा केल्याशिवाय कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Hello, I am speaking from Indian Embassy...; Forgery of arrest and fraud for release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.