Join us  

Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, रेल्वेही ठप्प!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 7:55 AM

पुढील 24 तासांत मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ठळक मुद्देरात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळे आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.

मुंबई: मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील 24 तासांत मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईसह उपनगरात दोन दिवस (४, ५ ऑगस्ट) अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्याजवळ नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे. ठाणे, रायगड आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत हायअलर्ट देण्यात आला आहे.

 

मुंबई पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.  रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळे आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तसेच, काही ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसेसचे मार्ग वळवळण्यात आलेत. यामध्ये सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, हिंदमाता यांचा समावेश आहे.

अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी आज बंद ठेवण्याचे महापालिकेने आवाहन केले आहे. पावसाचा लोकलवरही परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. हार्बर रेल्वे मार्गावरीलकुर्ला ते सीएसएमटी दरम्यान वाहतूक बंद तर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

आणखी बातम्या....

'अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे'; रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं व्यक्त केली इच्छा

भारताविरोधात चीनचा नवा डाव, नेपाळला मोहरा बनवून 'या' प्रकल्पाच्या कामाला केली सुरुवात    

Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"     

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका    

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

टॅग्स :मुंबईपाऊसमुंबई मान्सून अपडेट