मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचे धूमशान! कोल्हापूर, साताऱ्यातही दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:39 AM2020-07-05T05:39:25+5:302020-07-05T05:40:47+5:30

कोकणातही शनिवारी सर्वदूर पावसाचे धूमशान सुरू होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.

Heavy rain in Mumbai, Thane and Konkan! Heavy rains in Kolhapur and Satara too | मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचे धूमशान! कोल्हापूर, साताऱ्यातही दमदार पाऊस

मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाचे धूमशान! कोल्हापूर, साताऱ्यातही दमदार पाऊस

Next

मुंबई : मुंबईकरांना प्रतिक्षा असणारा पाऊस सुरू झाला असून मुंबई, ठाण्यासह उपनगरांना सलग दुसºया दिवशी मुसळधार पावसाने झोडपले. कोरोनामुळे अगोदरच मुंबईचा वेग मंदावला असून संततधार पावसामुळे त्याला पुरता ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले. मात्र सध्या लॉकडाऊन असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे जनजीवनावर होणाºया परिणामाची तेवढी तीव्रता यावेळी मुंबईत जाणवली नाही.
कोकणातही शनिवारी सर्वदूर पावसाचे धूमशान सुरू होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. खान्देशात नंदुरबार जिल्ह्यात, मराठवाड्यात नांदेड, बीड आणि विदर्भात वर्धा, आणि यवतमाळ जिल्ह्यात पाऊस झाला. वर्धा येथील सोनेगाव (स्टेशन) येथे ओसंडून वाहणाऱ्या नाल्यातून मार्ग काढताना दोन शेतमजूर महिलांचा बुडून मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे.
कोकणातही सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यात सोसाट्याच्या वाºयासह मुसळधार पाऊस कोसळला. चिपळुणातील वाशिष्ठी, शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंडणगड तालुक्यात तुळशी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. विन्हेरे घाटातही रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूकही बंद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सलग दुसºया दिवशी मुसळधार पाऊस झाला. माणगाव खोºयातील निर्मला नदीवरील ब्रिटिशकालीन आंबेरी पूल सलग दुसºया दिवशी पाण्याखाली गेल्यामुळे माणगावपासून शिवापूर पर्यंतच्या जवळपास २७ गावांचा संपर्क तुटला आहे. रायगड जिल्ह्यातही धो-धो पाऊस सुरू असून तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला.
 

रविवार मुसळधारेचा!
रविवार पालघर जिल्ह्याला आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

जनजीवन कोलमडले
पावसामुळे मुंबईचे जनजीवन कोलमडले होते. सकाळी ४.५७ मीटर उंचीच्या लाटा उसळळ्या होत्या. कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, भायखळा, गिरगाव, दादर, माहीम, वरळीसह सायन, माटुंगा, विलेपार्ले, मरोळ, अंधेरी, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकीनाका, पवई, घाटकोपर, विद्याविहार, बोरीवली, कांदिवली, भांडुप परिसरात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला होता. ३८ ठिकाणी झाडे कोसळली. २ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. ठाणे शहर परिसरात संध्याकाळपर्यंत सर्वाधिक १२०.६८ मिमी.पावसाची नोंद झाली.

Web Title: Heavy rain in Mumbai, Thane and Konkan! Heavy rains in Kolhapur and Satara too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.