विजांच्या कडकडासह उपनगरात जोरदार पाऊस वांद्रे, खार, सांताक्रुज परिसरात जोरदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 16:00 IST2023-09-28T16:00:51+5:302023-09-28T16:00:59+5:30
अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून त्याचा परिणाम विसर्जन मिरवणूक दिसून येत आहे.

विजांच्या कडकडासह उपनगरात जोरदार पाऊस वांद्रे, खार, सांताक्रुज परिसरात जोरदार पाऊस
श्रीकांत जाधव
मुंबई : विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह उपनगरात पावसाने दुपारपासून जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून त्याचा परिणाम विसर्जन मिरवणूक दिसून येत आहे.
गुरुवारी सकाळपासून कडक ऊन पडले होते. अनंत चतुर्थी असल्यामुळे जागोजागी मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. काही मंडळांनी आपल्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ केला आहे.
अशात दुपारी साडेतीन वाजल्यापासून वांद्रे, खार सांताक्रुझ, अंधेरी परिसरात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. विजांचा कडकडासह ढगांच्या गडगडाट सुरू असल्याने अनेकांच्या काळजात धडकी भरली आहे.
मुसळधार पावसामुळे काही क्षणातच परिसरातील मैदाने, रस्ते आणि सकल भागांची तळे झाले आहे. अनेक ठिकाणी गटार नाल्यात पाणी तुंबून रस्त्यावर साचले आहे.
या सर्वाचा परिणाम विसर्जन मिरवणूक दिसून येतोय. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाड सुरूच असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव गणेशभक्तांना मिरवणूक सोडून सुरक्षित स्थळाचा आधार घ्यावा लागत आहे.