पुन्हा एकदा मुंबईत उष्णतेची लाट धडकणार

By सचिन लुंगसे | Published: April 23, 2024 07:07 PM2024-04-23T19:07:05+5:302024-04-23T19:08:02+5:30

मुंबई महानगर प्रदेशात २६ ते २९ एप्रिलदरम्यान कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे.

Heat wave will hit Mumbai once again | पुन्हा एकदा मुंबईत उष्णतेची लाट धडकणार

पुन्हा एकदा मुंबईत उष्णतेची लाट धडकणार

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशात २६ ते २९ एप्रिलदरम्यान कमाल तापमानाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार असून, मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशाच्या आसपास नोंदविले जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
बुधवारी शहर आणि उपनगरात हवामान उष्ण, दमट राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ च्या आसपास राहील. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्हयांत काही ठिकाणी वादळी वा-यासह हलका पाऊस पडेल. - मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
 
गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी येणारी उष्णतेची लाट कमी दाहकता देणारी असली तरी तापमान चढे राहील. हवामान उष्ण असेल. आर्द्रता अधिक राहील. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर आणि कर्जतमधील कमाल तापमान ४० अंशावर जाईल. मुंबईचे तापमान ३७-३८ अंश राहील. - अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक 

Web Title: Heat wave will hit Mumbai once again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई