Join us  

विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जेईई परीक्षेची काळजी करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 12:39 PM

पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात या पूरस्थितीचा मोठा फटका बसला असून तब्बल 5 हजार कुटुंब बाधित झाले आहेत.

ठळक मुद्देपुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात या पूरस्थितीचा मोठा फटका बसला असून तब्बल 5 हजार कुटुंब बाधित झाले आहेत. ''विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे उद्यापासून होणारी जेईई मुख्य परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ नये. याबाबत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना विनंती केली आहे.

मुंबई - विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील तब्बल 2646 कुटुंब पूर बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. त्यातच, जेईई परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे, या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. 

पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात या पूरस्थितीचा मोठा फटका बसला असून तब्बल 5 हजार कुटुंब बाधित झाले आहेत. नदीकिनारच्या शेतीचेही मोठे नुकसान झालंय. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे, पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेसाठी हजर राहता येईल का, हा मोठा प्रश्न आहे. मात्र, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काळजी न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केलंय. 

''विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे उद्यापासून होणारी जेईई मुख्य परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ नये. याबाबत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना विनंती केली आहे. ही विनंती त्यांनी तत्काळ मान्य केली असून विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये'', असे ट्विट सामंत यांनी केले आहे. 

परीक्षार्थींना एक संधी मिळणार?

पूरग्रस्त भागात असलेल्या ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा होऊ शकणार नाही त्या केंद्रावरील विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून एक संधी देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, जे परीक्षार्थी परीक्षा न देता काही बहाणा देत असतील अशांना संधी मिळणार नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक डॉ. विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, जेईई मुख्य परीक्षेवर सध्या लक्ष केंद्रीत केलेले आहे. या परीक्षेला ९.५३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी ही परीक्षा ८ टप्प्यात झाली होती. यंदा ती दोन सत्रात सलग सहा दिवस म्हणजे १२ टप्प्यात होणार आहे.परीक्षा पुढे ढकलता येईल का?

हायकोर्टात याचिका

विदर्भामधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलता येईल का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी केंद्र व राज्य सरकारला केली आणि यावर मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. या परीक्षेला मंगळवारी सकाळी ९ वाजता प्रारंभ होणार आहे.

भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर 

भंडारा तालुक्यातील 23 गावातील 1790 कुटुंब, पवनी तालुक्यातील 22 गावातील 505, तुमसर तालुक्यातील 5 गावातील 127, मोहाडी तालुक्यातील 6 गावातील 167 व लाखांदूर तालुक्यातील 2 गावातील 57 कुटुंब असे एकूण 58 गावातील 2646 कुटुंब बाधित झाले आहेत. बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य करीत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. प्रशासन आपल्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी जिल्हावासीयांना दिली आहे.

दरम्यान, 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने विदर्भातील घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, असे म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मध्य प्रदेश सरकारसोबत राज्य शासनाने योग्य समन्वय साधला नाही. राजीव सागर धरणातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी 36 तासात पूर्व विदर्भात पोहोचते. मात्र, 36 तास हाती असतानाही विलंब केल्याने हे पाणी गावात शिरले. वेळीच अलर्ट दिला असता, तर हे संकट टाळता आलं असतं, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

टॅग्स :उदय सामंतपरीक्षामहाराष्ट्रपूरविदर्भविद्यार्थी