Great fire in MTNL building in Mumbai; 84 people were saved | मुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले
मुंबईत एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग; ८४ जणांना वाचविले

मुंबई : एमटीएनएलच्या वांद्रे पश्चिमेकडील इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्याला सोमवारी दुपारी मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या ८४ हून अधिक जणांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, अग्निशमन दलाचा जवान सागर दत्ता धुरात गुदमरल्याने त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आग विझविण्यासाठी १२ फायर इंजीन, ७ जम्बो वॉटर टँकर व १ रेस्क्यू वाहन, ७ स्पेशल अप्लायन्सेस, १ फायर रुग्णवाहिका, १० रुग्णवाहिकांसह रोबो फायरची मदत घेण्यात आली. इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्यांना सुखरूप खाली उतरविण्यासाठी अग्निशमन दलाने सर्वांत उंच शिडीचा वापर केला. वेगाने वाहणाºया वाºयामुळे आग पसरत असतानाच धुराचे लोटही परिसरावर जमा झाले. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या व लगतच्या परिसरावर धुरामुळे दिसणे अवघड झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास इमारतीमधून बाहेर काढलेल्यांचा आकडा ८४ वर गेला. तरीही ३० ते ३५ जण गच्चीवर अडकले होते. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते. या आगीमुळे वांद्रे परिसरातील ३० हजारांपेक्षा अधिक एमटीएनएलच्या फोनला फटका बसणार आहे. इमारतीच्या बाजूला असलेल्या अंजुमान-ए-इस्लाम शाळेतही धूर पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मृत्यूच्या दाढेत सेल्फीचा मोह
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काही कर्मचारी अडकले होते. या कर्मचाऱ्यांना मदत मिळावी म्हणून पाचव्या मजल्यावरून ते मदतीची याचना करत होते.
एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र तिला सुखरूप उतरविले जात असतानाच ती महिला सेल्फी काढत होती. या महिलेवर अनेकांनी टीका केली.


Web Title: Great fire in MTNL building in Mumbai; 84 people were saved
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.