'7/12 कोरा होणार नाहीच', सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 13:46 IST2020-03-06T13:44:10+5:302020-03-06T13:46:19+5:30
अर्थमंत्र्यांनी विधानभवनात सादर केलेला हा अर्थसंकल्प नसून जाहीर सभेतलं भाषण होतं. कारण, कुठलिही आकडेवारी अर्थसंकल्पीय भाषणात दिसून आली नाही,

'7/12 कोरा होणार नाहीच', सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली
मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. मराठवाडा, विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्राचा सरकारला विसर पडला आहे. कारण, या तिन्ही विभागांतील नागरिकांना अर्थसंकल्पात काहीही मिळालं नाही. कोकणाचा उल्लेख केला, पण कोकणासही जास्त काही मिळालं नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अर्थमंत्र्यांनी विधानभवनात सादर केलेला हा अर्थसंकल्प नसून जाहीर सभेतलं भाषण होतं. कारण, कुठलिही आकडेवारी अर्थसंकल्पीय भाषणात दिसून आली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ पोकळ भाषण आहे, त्यातून काहीच मिळालेलं नाही. शेतकऱ्यांच्या तोंडालाही सरकारने पाने पुसली आहेत. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 1 नवा पैसा सरकारने दिला नाही. शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी मदतीची घोषणा केली होती, पण या घोषणांचा विसर सत्ताधारी नेत्यांना पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे, शेतकऱ्यांचा सात-बारा कधीच कोरो हाणार नाही, हे अर्थसंकल्पावरुन स्पष्ट झालंय, असेही फडणवीस यांनी म्हटले.
पीक कर्जाव्यतिरिक्त इतर कुठल्याही कर्जाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा सात-बारा कोरा होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
Media interaction on Maharashtra Budget 2020 at Vidhan Bhavan, Mumbai https://t.co/lktphlveyS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 6, 2020