विजेच्या सब स्टेशनअभावी गोराईकरांना करावा लागतो वीजटंचाईचा सामना ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:04 PM2019-05-19T22:04:17+5:302019-05-19T22:04:19+5:30

गोराई येथील जामझाड पाडा येथे स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी गेल्या 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजता वीज आली.

Goraaikar has to deal with power shortage due to lack of electricity stations | विजेच्या सब स्टेशनअभावी गोराईकरांना करावा लागतो वीजटंचाईचा सामना ! 

विजेच्या सब स्टेशनअभावी गोराईकरांना करावा लागतो वीजटंचाईचा सामना ! 

Next

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - गोराई येथील जामझाड पाडा येथे स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी गेल्या 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजता वीज आली. मात्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आडमुठेपणामुळे गेली दोन वर्षे सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा करून गोराई बीच रोडवरील आईच्या वाडीत सबस्टेशन उभारले नाही.

सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळात बोरिवली पश्चिम गोराई खाडी पलिकडील गोराई बीचरोड वरील आईच्या वाडीतील वीजेच्या सब स्टेशन अभावी गोराई गावच्या हजारो नागरिकांना वीज टंचाईचा सामना करावा लागत आहे.वीज जाणे, एससी बिघडणे या गोष्टींचा सामना गोराईकरांना करावा लागत आहे. गोराईच्या प्रस्तावित असलेल्या विजेच्या सब स्टेशनला परवानगी देऊन सदर  येथे सब स्टेशन उभारून ती प्रकाशमान करावीत अशी येथील स्थानिक अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत गोराई येथील जोरम राजा कोळी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ' सहज बिजली, हर घर बिजली' - सौभाग्य या राष्ट्रीयीकृत योजनेलाच सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप गोराईकरांनी केला आहे.

येथे विजेचा तुटवडा असून येथे मागील रिलायन्स कंपनीने सब स्टेशन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. रिलायन्स वीज कंपनी जाऊन अदानी कंपनी आली. मात्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण यांना पत्र लिहून आणि पाठपुरवठा करून देखील गोराई येथे प्रस्तावित असलेल्या विजेच्या सब स्टेशनला अजून परवानगी मिळालेली नाही अशी खंत जोरम राजा कोळी यांनी व्यक्त केली. गोपाळ शेट्टी यांनी देखिल त्यांच्या मागील खासदारकीच्या कारकिर्दीत महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव यांना 2018 मध्ये दिलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ' सहज बिजली, हर घर बिजली' - सौभाग्य या राष्ट्रीयकृत योजनेचा निर्वाळा दिला आहे.

या योजनेनुसार देशातील शहरी तसेच खेडेगावातील प्रत्येक घर हे दळणवळणाच्या सोई आणि विजेच्या उपलब्धतेने जोडले गेले पाहिजे. आपल्या उत्तर मुंबई मतदारसंघातील गोराई येथील नागरिक विजेच्या मूलभूत सोईपासून वंचित असून सरकारने त्यांच्याकडे लक्ष देणे  गरजेचे आहे.या सुविधा पुरवण्यासाठी खासदार म्हणून माझ्यापरीने सातत्याने प्रयत्न केले होते.मागील रिलायन्स एनर्जीद्वारे गणपत पाटील नगर, गोराई जेट्टी, आईचीवाडी, गोराई बीच, गोराई बीच रोड, गोराई येथे वीजपुरवठा करण्यासाठी विजेचे सब स्टेशन बसवण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौभाग्य या राष्ट्रीयकृत योजनेचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा या एकमेव उद्देशाने आपण महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने सब स्टेशन उभारणीसाठी मंजूरी द्यावी जेणेकरून गोराई गाव व आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होऊ शकेल. सरकारी धोरणानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला वीज मिळणे हा मूलभूत अधिकार आहे असे शेट्टी यांनी ठामपणे सांगितले. 

Web Title: Goraaikar has to deal with power shortage due to lack of electricity stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.