विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 07:00 IST2026-04-11T06:59:52+5:302026-04-11T07:00:25+5:30

२९ किलो वजनाचे सोन्याचे बार सापडले

Gold smuggling worth Rs 38 crores exposed at airport; 26 Kenya nationals arrested by DRI | विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक

विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत तब्बल ३८ कोटी रुपयांच्या सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी केनियाच्या २६ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात डीआरआयने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. 

नैरोबी येथून एका मोठा ग्रुप मुंबईत येत असून, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर सोने असल्याची विशिष्ट माहिती डीआरआय अधिकाऱ्यांकडे होती. त्यानुसार, केक्यू २०२ या विमानाच्या बाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. या ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक महिला होत्या. अधिकाऱ्यांनी त्यांना ग्रीन चॅनलमधून बाहेर पडू दिले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

२९ किलो वजनाचे सोन्याचे बार

ग्रीन चॅनलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडील सामानात २९ किलो वजनाचे सोन्याचे बार आढळून आले. अटक करण्यात आलेल्या २५ जणांनी आपण तस्करी केली नसल्याचा दावा केला, तर एका व्यक्तीकडे बनावट पासपोर्ट असल्याने त्याला अटक करण्यात आली. मात्र त्यांच्या सामानात सोने आढळल्यानंतर त्यांना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

 

Web Title : मुंबई हवाई अड्डा: 38 करोड़ की सोने की तस्करी का भंडाफोड़, 26 केन्याई गिरफ्तार

Web Summary : मुंबई हवाई अड्डे पर DRI ने ₹38 करोड़ की सोने की तस्करी का भंडाफोड़ किया, 26 केन्याई नागरिकों को गिरफ्तार किया। नैरोबी से आ रहे एक समूह को खुफिया जानकारी के आधार पर रोका गया और उनके सामान में 29 किलो सोने की ईंटें मिलीं। एक व्यक्ति को नकली पासपोर्ट रखने के आरोप में गिरफ्तार किया गया।

Web Title : Mumbai Airport: 38 Crore Gold Smuggling Busted; 26 Kenyans Arrested

Web Summary : DRI busted a ₹38 crore gold smuggling operation at Mumbai Airport, arresting 26 Kenyan nationals. Acting on a tip, officials intercepted a group arriving from Nairobi and discovered 29 kg of gold bars hidden in their luggage. One individual was arrested for possessing a fake passport.