पीएफ मिळवून देतो, ‘ती’ मागणी पूर्ण कर! कंपनी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:32 AM2024-03-22T11:32:47+5:302024-03-22T11:33:12+5:30

‘वडिलांचा भविष्य निर्वाहनिधी (ईपीएफ) मिळवून देतो, माझी शरीरसुखाची मागणी पूर्ण कर,’ अशा आशयाचा मेसेज २४ वर्षीय तरुणीला

Get PF fulfill my demand Offense against company manager | पीएफ मिळवून देतो, ‘ती’ मागणी पूर्ण कर! कंपनी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा

पीएफ मिळवून देतो, ‘ती’ मागणी पूर्ण कर! कंपनी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा

मुंबई :

‘वडिलांचा भविष्य निर्वाहनिधी (ईपीएफ) मिळवून देतो, माझी शरीरसुखाची मागणी पूर्ण कर,’ अशा आशयाचा मेसेज २४ वर्षीय तरुणीला पाठवल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी बुधवारी रात्री दक्षिण मुंबईतील एका कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार तरुणी एका गरीब कुटुंबातील असून, घरकाम करून १९ वर्षांचा भाऊ आणि ७५ वर्षीय आजीची काळजी घेते. तिच्या आईने घटस्फोट घेतल्यानंतर ती कुटुंबापासूनही विभक्त झाली. तरुणीचे वडील २००९ ते २०१५ दरम्यान माझगाव येथील एका कंपनीत काम करत होते. ती १५ वर्षांची असताना २०१५ मध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या पगारातून कापलेल्या ईपीएफची रक्कम तिला नॉमिनी म्हणून १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार होती. त्यानुसार १८ वर्षांची झाल्यावर तिने वांद्रे येथील ईपीएफ कार्यालयात ईपीएफचा दावा करण्यासाठी फॉर्म भरला. मात्र, पाच वर्षे पीएफ ऑफिसकडे पाठपुरावा करूनही तिला अजूनही देणी मिळालेली नाहीत.

तरुणीने खेरवाडी पोलिस ठाण्यात सुशांत याच्या असभ्य संभाषणाच्या स्क्रीनशॉटसह तक्रार दाखल केली. त्यानुसार सुशांत सर याच्याविरुद्ध कलम ५०९ बी (इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे लैंगिक छळ), माहिती तंत्रज्ञान कायदा ६७ ए (लैंगिक कृत्ये असलेली सामग्री इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसारित करणे) अन्वये गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

‘वडिलांची फाइल कंपनीचे व्यवस्थापक सुशांत यांना पाठवली आहे. ईपीएफची रक्कम ४५ दिवसांत तुला मिळेल,’ असे ईपीएफ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये तरुणीला कळवले. मात्र, तीन महिने उलटूनही ईपीएफ न मिळाल्याने तिने सुशांत याच्याशी संपर्क साधला. ईपीएफ रक्कम मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. त्याकडे तिने दुर्लक्ष केले. परंतु, यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिने ईपीएफसाठी पाठपुरावा केला तेव्हा त्याने शरीर सुखाची मागणी करणारे मेसेज पाठवण्यास सुरुवात केल्याचे तिने ‘एफआयआर’मध्ये म्हटले आहे.

Web Title: Get PF fulfill my demand Offense against company manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.