Join us

कमी प्रतिसादामुळे माथेरानच्या राणीतून मालवाहतूक बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 19:55 IST

लॉकडाऊनमुळे माथेरानची मिनी ट्रेन बंद करण्यात आली असल्यामुळे येथील स्थानिकांना अत्यावश्यक वस्तुंची ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.  

मुंबई - लॉकडाऊन काळात माथेरानची राणी असलेली मिनी ट्रेन बंद आहे. मात्र ही ट्रेन 22 मेपासून फक्त मालवाहतुकीसाठी सुरू करण्यात आली होती. दोन दिवस प्रतिसाद मिळाल्यानंतर मालवाहतुकीचा प्रतिसाद कमी झाला. परिणामी, मिनी ट्रेनमधील मालवाहतूक बंद करण्यात आली आहे. 

लॉकडाऊनमुळे माथेरानची मिनी ट्रेन बंद करण्यात आली असल्यामुळे येथील स्थानिकांना अत्यावश्यक वस्तुंची ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.  मिनी ट्रेन सुरु करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेशी संपर्क केला असून अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेनची सेवा सुरु करण्याचे आदेश दिले. पार्सल आणि माल वाहतुकीचे दोन डबे घेऊन माथेरान ते अमन लॉंज मिनी ट्रेनचा प्रवास सुरू झाला. मात्र सुरुवातीचे दोन दिवस मालवाहतूकीला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पुढील दिवसात पार्सल, इतर सामग्रीची वाहतुकीला प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे  मध्य रेल्वे प्रशासनाने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागाला यासंदर्भात कळविण्यात आले असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार

Mitron युजर्ससाठी अलर्ट! त्वरित डिलीट करा अ‍ॅप नाहीतर...

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'या' राज्याचा रेकॉर्ड; तब्बल 4.85 कोटी लोकांचं केलं स्क्रिनिंग

CoronaVirus News : ...अन् संरक्षणासाठी न्यायालयात गेलेल्या नवविवाहीत जोडप्याला ठोठावला 10 हजारांचा दंड

Cyclone Nisarga : अरविंद केजरीवालांनी केलं उद्धव ठाकरेंसाठी ट्विट; म्हणाले...

CoronaVirus News : देशातील रुग्णांची संख्या 2 लाखांवर; कोरोनाच्या संकटात ICMRने दिली दिलासादायक माहिती

टॅग्स :माथेरान