चार दिवस कोसळधारा;मुसळधार ते अतिमुसळधार वृष्टीची शक्यता, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 09:14 AM2021-08-29T09:14:18+5:302021-08-29T09:14:23+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे.

Four days of torrential downpour; Chance of torrential to very heavy rain, Orange alert for some districts pdc | चार दिवस कोसळधारा;मुसळधार ते अतिमुसळधार वृष्टीची शक्यता, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

चार दिवस कोसळधारा;मुसळधार ते अतिमुसळधार वृष्टीची शक्यता, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Next

मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, यामुळे राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टदेखील देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. राज्यात तापमान एकदम वाढले असून उन्हाळा असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील उभी पिके धोक्यात आली असून शेतकरी संकटात सापडला आहे. अर्धा पावसाळा संपून गेला तरी राज्यातील अनेक धरणे तहानलेलीच आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेला हा इशारा पावसाच्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे.
नंदुरबार, जालना, बुलडाणा, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोलीला चांगल्या पावसाची गरज आहे.

२९ ऑगस्ट-

जिल्हे : गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
अंदाज : विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल.

३० ऑगस्ट-

जिल्हे : जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, जालना, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर व रत्नागिरी
अंदाज : विजांच्या कडकडाटासह पाऊस. परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

३१ ऑगस्ट-

जिल्हे : नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, पालघर, मुंबई व रत्नागिरी
अंदाज : विजांसह पाऊस. नाशिक, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांला ऑरेंज अलर्ट

१ सप्टेंबर-

जिल्हे : नंदुरबार, नाशिक, ठाणे, मुंबई आणि रायगड

अंदाज : चांगला पाऊस. पालघरला ऑरेंज अलर्ट

केवळ ६१ टक्के जलसाठा, आता सप्टेंबरवर मदार

जून आणि जुलै महिन्यात झोडपून काढणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र मुंबईसह महाराष्ट्राकडे पाठ फिरवली. ऑगस्ट महिन्यात तब्बल दोन वेळा पावसात खंड पडला असून, महाराष्ट्रात सध्या ६१ टक्के जलसाठ्याची नोंद आहे. परिणामी, आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे सप्टेंबरकडे लागले आहेत. भारतीय हवामान खात्याकडील माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राला दिलासा देऊ शकेल.

आतापर्यंतचा पाऊस
५९ टक्के ते उणे २० टक्के (किंवा घट)
२०-५९% पाऊस
मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, बीड, जालना आणि परभणी.

उणे १९ ते १९% पर्यंत पाऊस
मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद, धुळे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा.

Web Title: Four days of torrential downpour; Chance of torrential to very heavy rain, Orange alert for some districts pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.