विश्वनाथ महाडेश्वरांसह ३ नगरसेवकांची अटक अन् काही क्षणातच जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 08:44 PM2022-04-25T20:44:34+5:302022-04-25T20:44:51+5:30

सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या चार माजी नगरसेवकांना अटक झाली होती.

Former Mayor Vishwanath Mahadeshwar and 3 corporators arrested and released on bail | विश्वनाथ महाडेश्वरांसह ३ नगरसेवकांची अटक अन् काही क्षणातच जामिनावर सुटका

विश्वनाथ महाडेश्वरांसह ३ नगरसेवकांची अटक अन् काही क्षणातच जामिनावर सुटका

Next

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. महाडेश्वर यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. मात्र काही मिनिटातंच लगेचच त्यांची सुटका करण्यात आली. चौघांवरही जामीनपात्र गुन्हे असल्यानं पोलिसांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 

सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या चार माजी नगरसेवकांना अटक झाली होती. दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, हाजी अलीम यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांच्याविरोधात जामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांची लगेच सुटका झाली. 

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांच्या भेटीसाठी सोमय्या पोहोचले आहेत. त्यावेळी पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोमय्या पोलीस ठाण्यातून निघत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. त्यांच्या कारची काच फुटली आणि सोमय्यांना जखम झाली. या हल्ल्याप्रकरणी माजी  महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झाली आहे.

क्राईम ब्रांचच्यावतीने चौकशी झाली पाहिजे- भाजपाचे नेते अतुल भातखळकर

महाडेश्वर यांच्यावर फुटकळ कारवाई करून भागणार नाही, या संपूर्ण प्रकरणाची क्राईम ब्रांचच्यावतीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच हा हल्लाच नाही, असे म्हणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही माफी मागितली पाहिजे, असं अतुल भातखळकर ट्विटरद्वारे म्हणाले. 

Web Title: Former Mayor Vishwanath Mahadeshwar and 3 corporators arrested and released on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.