अनिल देशमुखांना १२ नाेव्हेंबरपर्यंत सुनावली ईडी कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 07:32 IST2021-11-08T07:32:36+5:302021-11-08T07:32:58+5:30
ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका तातडीने उच्च न्यायालयात दाखल केली.

अनिल देशमुखांना १२ नाेव्हेंबरपर्यंत सुनावली ईडी कोठडी
मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुख यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा विशेष न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने रविवारी रद्द करत त्यांचा ताबा पुन्हा एकदा ईडीकडे दिला. त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.
शनिवारी विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत नऊ दिवस वाढ करण्यास नकार दिला. त्यामुळे ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका तातडीने उच्च न्यायालयात दाखल केली.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आम्हाला आवश्यक ती कागदपत्रे मिळाली नाहीत. परिणामी आम्हाला त्यांची नीट चौकशी करता आली आहे. त्यांची केवळ पाच दिवसच चौकशी करता आली. अनिल देशमुख यांनीही तपास अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास टाळले. त्यामुळे त्यांचा आणखी नऊ दिवस ताबा देण्याची मागणी आम्ही विशेष न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने आम्हाला तपास करण्याची पुरेशी संधी देण्यास नाकारली. ईडीची चौकशी इतक्या कमी वेळात पूर्ण होऊ शकत नाही.