गणरायाच्या मूर्तींची उंची कमी ठेवण्याची सक्ती करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 06:39 PM2020-07-04T18:39:21+5:302020-07-04T18:39:54+5:30

खासदार गोपाळ शेट्टी यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

Force the statues of the Ganarayana to be kept low | गणरायाच्या मूर्तींची उंची कमी ठेवण्याची सक्ती करा

गणरायाच्या मूर्तींची उंची कमी ठेवण्याची सक्ती करा

Next

 

मनोहर कुंभेजकर

मुंबई : देशभरात तसेच महाराष्ट्रात आणि मुंबई शहरात कोरोना महामारी काही थांबण्याचे नाव घेत नाही आणि पुढील महिन्यापासून महाराष्ट्रात अनेक सण साजरे करण्याबाबत जनमानसात चर्चा सुरू आहे.  खास करून दि,22 ऑगस्ट पासूूून साजरा होणारा गणेशोत्सव हा एक महत्वाचा सण असून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या मुंबईत खूप मोठी आहे.

आत्ता कोरोना महामारीच्या संकटातून आपण सर्वजण जात असून त्याचा प्रसार होत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक गणपतीची मूर्ती 3 ते 4 फूट ठेवावी असे आदेश त्यांनी अलिकडेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. गणरायाच्या मूर्तीची उंची कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विचारांचे समर्थन उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले आहे. जवळ जवळ  सर्व मोठया मंडळाची उंची ही गणरायाच्या उंचीवर मंडळ  किती मोठे आहे हे ठरवीली जाते, मात्र त्यांच्या सामाजिक कार्य आणि बांधिलकीवर नाही. गेले काही दशके शासन, प्रशासनाने देखिल यावर विशेष लक्ष दिले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  त्यामुळे हिच बदल  घडवून आणण्याची आणि काही करण्याची वेळ असून गणरायाच्या मूर्तींची उंची कमी ठेवण्याची सक्ती करा अशी मागणी खासदार शेट्टी  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्रा द्वारे केली आहे. आपल्या मुख्यमंत्री पदकाळातील  गणेश मूर्तींची उंची कमी करण्याबाबत घेतलेला निर्णय नोंदनीय ठरेल असे देखिल त्यांनी पत्रातून सुचवायचे आहे. 

 डॉ .शुभा राऊळ या 2007 ते 2009 या काळात मुंबईच्या महापौर असतांना लालबागच्या राजाची उंची जास्त असल्याने मिरवणुकीच्या मार्गावर असलेला एक ब्रिजची उंची कमी आणि बाप्पाची उंची जास्त असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी  डॉ. राऊळ यांनी गणपती बाप्पाची उंची कमी करण्याबाबत विचार प्रकट केले होते. प्रसार माध्यम पासून ते सर्व धार्मीक, बुध्दीजीवी एका बाजुला असे दॄष्य तयार झाले होते याची आठवण त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. दहिसर विठ्ठल मंदिर गणेशोत्सव मंडळाचा खास उल्लेख करतांना या मंडळाने गेले अनेक वर्ष गणेश मूर्तीचा  आकार आणि उंची एक समान ठेवली आहे.अशी अनेक मंडळे मुंबईत  असतील अशा सर्वांची नोंद घेवून त्यांचा योग्यतो सन्मान केला पाहिजे,तरच नागरिक प्रतिसाद देतील असे मत त्यांनी व्यक्त केले.

 गोवा राज्य हे पर्यटन साठी प्रसिध्द असून गेल्या दशकापासून समुद्रात विसर्जनाला बंदी आहे. तसेच पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता येथे पूर्वी मोहरम मिरवणुक दरम्यान मिरवणुक काढणारे मोठया मोठया तलवारी हातात घेवून मिरवणूकीत  प्रदर्शन करायचे.  ज्योती बसू  हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी मिरवणुकीत दोन इंचाची तलवार हातात घेण्यास परवानगी दिली.  नंतरच्या काळात मोहरमच्या मिरवणुकीत तलवार प्रदर्शन बंदच झाले हा किस्सा देखिल त्यांनी पत्रातून खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेवटी व्यक्त केला आहे.
 

Web Title: Force the statues of the Ganarayana to be kept low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.