Following in the footsteps of Queen Lakshmibai and Veer Shivaji, I will continue my work, Kangana Ranaut share memes | लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन - कंगना राणौत

लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन - कंगना राणौत

अभिनेत्री कंगना रणौतने ( Kangna Ranaut) शनिवारी एक मीम्स शेअर करून शिवसेनेवर ( Shiv Sena) हल्लाबोल केला. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी शेअर केलेला मीम्स कंगानानं पोस्ट केला. या मीम्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई यांना युद्धात उतरण्यापूर्वी मानाची तलवार देताना दिसत आहे. या फोटोवरून कंगनानं नवा वाद छेडला आहे. 

...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

कंगनाने मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचे म्हणत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यावर शिवसेनेने तिच्यावर टीकास्त्र सोडले. त्यातून वाद पेटला. शिवसेनेने हा विषय आमच्यासाठी संपला असे म्हटले असले तरी कंगना मागे हटायला तयार नाही. शिवसेनेवर टीका करतानाच तिने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही काही प्रश्न केले.

‘प्रिय आणि सन्मानीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तुम्ही एक महिला आहात. मग महाराष्ट्रातील तुमचे सरकार माझ्यासोबत करत असलेल्या वर्तुणुकीचा तुम्हाला राग येत नाही का? तुमचे सरकार महिलेवर अन्याय करत आहे, कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवत आहे. तुम्ही आता बोलले पाहिजे. मला आशा आहे की तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप कराल. 

प्रकाश राज यांनी शेअर केलं कंगना रनौतचं मीम, म्हणाले - कंगना राणी लक्ष्मीबाई आहे तर मग....

कंगनाला नुकसानभरपाई मिळायला हवी - आठवले
कंगना रनौतच्या कार्यालयावर महापालिकेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. नियमांचे उल्लंघन करून ती करण्यात आल्याने कंगनाला नुकसानभरपाई मिळायला हवी, अशी मागणी आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. आठवले यांनी शुक्रवारी सकाळी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. यावेळी कंगनाला नुकसान भरपाई मिळावी, कोरोना आणि कोझिकोड विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले कॅप्टन दीपक साठे यांच्याबाबत त्यांनी चर्चा केली. 

राखी सावंतची 'सटकली', कंगनाला भिकारी म्हणाली... पाहा व्हिडीओ

कंगना आता काय म्हणाली?
मला अनेक मीम्स मिळाले, त्यापैकी हा एक मला माझे मित्र विवेक अग्नीहोत्री यांनी पाठवला आहे. त्यानं मी खूप भावूक झाली आहे. लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.


उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणे फरहा अली खानला खटकले 
कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. कंगनानं ठाकरेंचा थेट एकेरी उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनानं आव्हान देणारी भाषा केली आहे. 'उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू बॉलिवूड माफियांसोबत मिळून माझं घर उद्धवस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा हा अहंकार मोडून पडेल,' अशा शब्दांमध्ये कंगनानं मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. 

कंगणा राणौतचा उद्धव ठाकरे यांचा अशा पद्धतीने अपमान करणे ऋतिकची मेहुणी फराह अली खानलाही रुचले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उच्चार करत त्यांचा कंगणाने अमपान केला असल्याचे तिने म्हटले आहे. सोशल मीडियावर  ट्वीट करत तिने कंगणावर संताप व्यक्त केला आहे.फराह अली खानचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. 

उद्धव ठाकरे  महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा आदराणेच उल्लेख व्हायला हवा. काही राजकारण्यांविरूद्ध माझ्याकडेही शंभर तक्रारी असू शकतात पण मी कधीही कुणालाही अनादरपूर्वक वैयक्तिकरित्या कधीच बोलले नाही आणि  मी कधीच तसे करणार नाही. कारण मला निवडलेल्या प्रतिनिधींचा आदर करणे शिकवले गेले आहे, जरी मी त्यांच्या राजकारणाशी सहमत नसले तरीही.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Following in the footsteps of Queen Lakshmibai and Veer Shivaji, I will continue my work, Kangana Ranaut share memes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.