उणे तापमानात फडकले ७६ ध्वजांचे ध्वजतोरण; महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:31 PM2023-08-16T12:31:59+5:302023-08-16T12:32:37+5:30

माउंट उटी कांगरी हे लडाख येथे असलेले गिर्यारोहणाचे ठिकाण आहे.

flagpole of 76 flag flew in sub zero temperatures great performance of mountaineers in maharashtra | उणे तापमानात फडकले ७६ ध्वजांचे ध्वजतोरण; महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी

उणे तापमानात फडकले ७६ ध्वजांचे ध्वजतोरण; महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लडाखमधील माउंट युटी कांग्री ६०७० मीटर उंचीचे शिखर सर करत ७६ भारतीय ध्वजांचे ध्वजतोरण फडकावून महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला. या टीममध्ये  सोलापूरमधील गिर्यारोहक बाळकृष्ण जाधव, कल्याणचे नीलेश माने आणि मुंबईतील गिर्यारोहक वैभव ऐवळे यांचा समावेश होता.

९ ऑगस्ट रोजी टीमने मुंबईहून मोहिमेला सुरुवात केली. दोन दिवस लेहमध्ये वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी थांबले. ११ तारखेला जवळपास ९० किमीचा प्रवास करत टीमने रूमतसे गावातून ट्रेकला सुरुवात केली. हे गाव जवळपास ४३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. टीमने २ तासांचा ट्रेक करत ४८०० मीटर उंचीपर्यंत जाऊन (ॲकलमटायझेशन वॉक) पुन्हा बेस कॅम्पला रात्रीचा मुक्काम केला. वेगाने वाहणारे वारे आणि जवळपास ०-१ डिग्री तापमान अशा परिस्थितीत रात्र काढणे म्हणजे अशक्यच. परंतु टीमचा मागील अनुभव आणि त्यांनी केलेली मानसिक आणि शारीरिक तयारी या जोरावर त्यांनी ही मोहीम फत्ते केली.

दुसऱ्या दिवशी टीमने बेस कॅम्प ते कॅम्प १ (समिट कॅम्प) ५,३५० मीटर उंचीवर नेला. जवळपास ५ ते ६ तासांच्या प्रवासात निसर्गाचे मनमोहक दर्शन झाले. दूरवर दिसणारा थोडा बर्फात लपलेला उटी कांग्री, डाव्या हाताने वाहणारी नदी, हिरवेगार गवत, चहुबाजूंनी पसरलेली पर्वतरांग, मनमोहक दृश्य बघताना पाठीवरचे वजन जाणवत नव्हते. साधारणत: हाई अल्टीट्युडवर ऑक्सिजनची कमतरता असते, उणे तापमान, वेगाने वाहणारे वारे, स्नो फॉल, मोरेन्स अशी अनेक आव्हाने समोर होती.

आव्हानात्मक शिखर

माउंट उटी कांगरी हे लडाख येथे असलेले गिर्यारोहणाचे ठिकाण आहे. हे आव्हानात्मक शिखर ६०७० मीटर (१९,९१५ फूट) अशा उंचीचे आहे.

 

Web Title: flagpole of 76 flag flew in sub zero temperatures great performance of mountaineers in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.