मेट्रो-४ मार्गिकेवर पहिल्यांदाच यू-गर्डरचे यशस्वीरीत्या काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:02 AM2019-12-31T01:02:53+5:302019-12-31T01:03:01+5:30

मुलुंड येथे कामगार हॉस्पिटलजवळ प्रथमत: यू-गर्डर टाकण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण

For the first time, the U-Girder has been successfully completed on the Metro-7 route | मेट्रो-४ मार्गिकेवर पहिल्यांदाच यू-गर्डरचे यशस्वीरीत्या काम पूर्ण

मेट्रो-४ मार्गिकेवर पहिल्यांदाच यू-गर्डरचे यशस्वीरीत्या काम पूर्ण

Next

मुंबई : वडाळा-घाटकोपर-ठाणे-मुलुंड- कासारवडवली या मेट्रो-४ या उन्नत मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) करण्यात येत आहे. या मार्गिकेवर मुलुंड येथे कामगार हॉस्पिटलजवळ प्रथमत: यू-गर्डर टाकण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. हे काम मंगळवारच्या पहाटे करण्यात आले आहे.

वडाळा-घाटकोपर-ठाणे-मुलुंड-कासारवडवली अशी ही मेट्रो-४ मार्गिका संपूर्णत: उन्नत मार्गे बांधण्यात येणार आहे. ३२.३२ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेसाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेवर एकूण ३२ स्थानके बांधण्यात येणार आहे. दरदिवशी वडाळा - घाटकोपर - ठाणे -कासारवडवली या मार्गावर २०२१ रोजीपर्यंत ८ लाख ७० हजार प्रवासी तर २०३१ रोजीपर्यंत १२ लाख १० हजार प्रवासी प्रवास करतील. या मार्गिकेच्या विकासकामांसाठीच्या खरेदी आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो-४ मार्गिकांशी संबंधित कामे वेगाने सुरू आहेत. रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, ट्रेन कंट्रोल आदीबाबतच्या कामांचे करार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २० डिसेंबर, २०१९ रोजी रोलिंग स्टॉकची निविदा काढण्यात आली आहे.

Web Title: For the first time, the U-Girder has been successfully completed on the Metro-7 route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो