Fire in Mehta building in Kurla was finally under control | कुर्ला येथील मेहता इमारतीला लागलेली भीषण आग अखेर नियंत्रणात

कुर्ला येथील मेहता इमारतीला लागलेली भीषण आग अखेर नियंत्रणात

मुंबई - कुर्ला पश्चिमेतील स. गो. बर्वे मार्गावर असलेल्या मेहता इमारतीला लागलेली आग शमवण्यात अखेर अग्निशमन दलाला यश आले आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने 10 वाजल्यापासून आग शमवण्याचे काम सुरू केले. अखेरीस रात्री दीडच्या सुमारास आग नियंत्रणात आली, तर सव्वादोनच्या सुमारास आग पूर्णपणे शमवण्यात अग्निशमन दलाला यश आले.ऑ

 इमारतीमधून स्फोटाचे आवाज येत असल्याने रहिवाशांचे सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. 


कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर असलेल्या पालिका एल विभागाच्या बाजूच्या मेहता इमारतीला भीषण आग लागली होती. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या  घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीमधून स्फोटाचे मोठे आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fire in Mehta building in Kurla was finally under control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.